कोरोना रूग्णांसाठी निधी गोळा करण्यासाठी 'विरूष्का'चा पुढाकार, पोस्ट केला व्हिडिओ

मदतीसाठी पुढे आले विराट-अनुष्का

Updated: May 7, 2021, 02:44 PM IST
कोरोना रूग्णांसाठी निधी गोळा करण्यासाठी 'विरूष्का'चा पुढाकार, पोस्ट केला व्हिडिओ title=

मुंबई : देशात दररोद कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचा जीव जात आहे. दररोज लाखो लोक या महामारीच्या जाळ्यात अडकत आहेत. अशावेळी सेलिब्रिटी लोकप्रिय जोडी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) मदतीसाठी पुढे सरसावले आहे. कोरोनाबाधितांसाठी फंड जमा करण्यासाठी या दोघांनी कॅम्पेन सुरू केलं आहे. विरूष्काने याबाबतचा व्हिडिओ तयार करून पोस्ट केला आहे. 

आयपीएल २०२१ला कोरोनामुळे स्थगित केल्यानंतर आता विराट गरजूंना मदत करण्यासाठी सरसावला आहे. अनुष्का आणि विराटने याबाबत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. अनुष्काने ट्वीटर अकाऊंटवर पती विराट कोहलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपला देश लढा देत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आपल्या लोकांच्या समस्या पाहून मी दुःखी झाले. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी आणि विराटने #InThisTogether ही मोहिम सुरु केली आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेमध्ये अनेक गरजूंची गैरसोय झाली. अनुष्काने आपल्या वाढदिवसादिवशी तयार केलेला व्हिडिओत तिने याबाबत हळहळ व्यक्त केली. तेव्हापासून ती या उपक्रमाची माहिती देत होती. अखेर विराट आणि अनुष्काने पुढाकार घेत या उपक्रमाची सगळी माहिती दिली आहे.