मुंबईः हे वर्ष बॉलीवूडमध्ये एकाच चित्रपटाचे होते आणि तो म्हणजे 'काश्मिर फाईल्स' कारण यावर्षी मोठमोठ्या स्टारचे सिनेमेही चांगलेच फ्लोप झाले. या वर्षी एकाही बॉलीवूड स्टार अभिनेत्याचा चित्रपट हिट झाला नाही. त्यातून 'काश्मिर फाईल्स' या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री बरेच चर्चेत आले होते. त्यांचा चांगलाच गवगवा झाला होता. त्यामुळे अख्ख्या बॉलीवूडमध्ये त्यांचीच चलती होती.
विवेक अग्निहोत्री 'काश्मिर फाईल्स'प्रमाणे 'द दिल्ली फाईल्स' हा चित्रपट लवकरच घेऊन येणार आहेत. तेव्हा या चित्रपटाची 'काश्मिर फाईल्स'प्रमाणे हवा राहील अशी शक्यता आहेच त्यात सध्या फॉर्ममध्ये असलेले विवेक अग्निहोत्री बॉलीवूडवरही जोरदार टीका करत आहेत. विवेक अग्निहोत्री त्यांच्या ट्विवर अकांऊटवरही एक्टिव असतात. सध्या ते त्यांच्या एका वेगळ्याच ट्विटमुळे चर्चेत आहेत. ते ट्विव थेट बॉलीवूडच्या मोठ्या स्टारर्सना टार्गेट करणारे आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी बॉलीवूड किंग शाहरूख खानवर लिहिलेले एक आर्टिकल शेअर केले आहे. ज्याचे टायटल why shahrukh khan is still 'king of bollywood' असे आहे. त्यालाच रिट्विट करून विवेक अग्निहोत्री यांनी जोपर्यंत बॉलीवूडमध्ये King, badshah, sultan यांचे राज्य आहे तोपर्यंत बॉलीवूड इंडस्ट्री घसरतच राहणार. त्यापेक्षा या इंडस्ट्रीला लोकांची इंडस्ट्री बनवा आणि लोकांच्या कथा त्यांच्यापर्यंत पोहचवा तरच ही इंडस्ट्री जगात नाव कमावेल, असं म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी हे ट्विट शेअर करत त्याला #fact असे म्हटले आहे. यावरून त्यांनी किंग, बादशहा म्हणजे शाहरूख खान आणि सुलतान म्हणजे सलमान खान या दोघांना टार्गेट करत त्यांच्यावर आरोप केले आहेत.
As long as Bollywood has Kings, Badshahs, Sultans, it will keep sinking. Make it people’s industry with people’s stories, it will lead the global film industry. #FACT https://t.co/msqfrb7gS3
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 14, 2022
COVID-19 मुळे चित्रपट उद्योग आणि सिनेमा पूर्णपणे बदलला. 2 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाच्या घटनेवर आधारित विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने प्रेक्षकांनी मनं जिंकली केली आणि बॉलीवूडमधील टॉपच्या स्टारर्सच्या भुवया उंचावल्या आहेत. विवेकचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट या वर्षीच्या बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा चित्रपट ठरला. कोविड महामारीनंतर ₹300 कोटींचा गल्ला पार करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.