close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विवेक ओबेरॉयचा माफी मागण्यास नकार

विवेकच्या या कृतीनंतर त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated: May 20, 2019, 09:14 PM IST
विवेक ओबेरॉयचा माफी मागण्यास नकार

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने शेयर केलेल्या मीमच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. विवेकच्या या कृतीनंतर महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. पण त्यानंतर त्याने माफी मागण्यास सपशेल नकार दिला आहे. विवेकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक विनोदी मीम शेअर केले आहे. त्याने शेअर केलेला हा मीम चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
 

विवेकने हा मीम शेअर केल्यानंतर महिला आयोगाने या ट्विटची दखल घेत त्याला कायदेशीर नोटीस पाठवली होती. आता विवेक विरोधात कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे. 

मीममध्ये अभिनेता सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दिसत आहे. एक्झिट पोलच्याच पार्श्वभूमीवर या त्रिकुटांचे मीम सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. 

सलमान खान 'ओपिनियन पोल'तर विवेक 'एक्झिट पोल' असं दर्शवण्यात आले आहे.विवेकच्या या कृतीनंतर त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.