मुंबई : कलाविश्वात सुरु असणारे लग्नसराईचे वारे अद्यापही वाहतच आहेत. सेलिब्रिटींचे विवाहसोहळे म्हटलं की तिथं येणाऱ्या पाहुण्यांपासून ते अगदी विवाहसोहळा नेमका कुठे पार पडणार आहे इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचीच उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली असते. सोशल मीडियामुळं याची झलक अगदी सहजपणे चाहत्यांना पाहता येते.
सध्या अशाच एका लोकप्रिय सेलिब्रिटीच्या लग्नसोहळ्याच्या फोटोंनी सर्वांच्या नजरा रोखल्या आहेत.
दिमाखदार आणि अतिरंगतदार असेच शब्द वापरून सांगण्याजोगा हा विवाहसोहळा आहे पंजाबी गायक परमिश वर्मा याचा. प्रेयसी गीत ग्रेवाल हिच्यासह परमिशनं शीख धर्मपद्धतीनं लग्नगाठ बांधली.
लग्नाच्या बेडित अडकल्यानंतर या जोडीनं आपापल्या सोशल मीडिया हँडलवर काही खास फोटो पोस्ट केले.
दिमाखदार सोहळ्याची नेमकी व्याख्या काय, हेच या जोडीचे फोटो पाहताना लक्षात येत आहे. बऱ्याच काळाच्या डेटिंगनंतर परमिश आणि गीत लग्नबंधनात अडकले.
कॅनडामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. जिथं जवळचे मित्र आणि दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. परमिश आणि गीत या दोघांनीही हा लग्नसोहळा पूर्णपणे एन्जॉय केला.
हेवी वर्क शेरवानी आणि लाल रंगाची पगडी, असा एकंदर परमिशचा लग्नाचा लूक होता. तर, गीतन यावेळी लाल रंगाच्या लेहंग्याला पसंती दिली होती.