VIDEO : आपल्या डायलॉगसाठी डेजी शाह झाली Troll

सलमान खानने देखील उडवली खिल्ली 

VIDEO : आपल्या डायलॉगसाठी डेजी शाह झाली  Troll title=

मुंबई : रेस 3 बॉलिवूडमधील असा सिनेमा आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने धूम केली आहे अगदी 3 दिवसांतच यूट्यूबवर चाहत्यांच्या पसंतीला पडला आहे. असं सगळं असताना या ट्रेलरमधील एका डायलॉगमुळे अभिनेत्री डेजी शाह ट्रोल झाली आहे. लोकांनी तिच्यावर भरभरून टीका केली आणि असं सगळं असताना खुद्दल सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीसने देखील याची मस्करी केली आहे. 

रेस3 च्या ट्रेलरमध्ये डेजी शाह म्हणते की, अवर बिझनेस इज अवर बिझनेस इट्स नन ऑफ यॉर बिझनेस.. ट्रेलरमधील या वाक्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ट्रोल होताच मुंबई पोलिसांनी ऑनलाईन डाटा सेफ्टीचा मजेशीर अंदाजात संदेश दिला आहे. 

एवढंच नव्हे तर सलमानने देखील यावर मस्करी केली आहे. त्याने देखील एक व्हिडिओ बनवून डेजी शाहची मस्करी उडवली आहे.