VIDEO : चाहत्याने बनवला 'रेस ३'चा Low BUDGET ट्रेलर, सलमान खानला हसू आवरेना!

सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतआहे. सलमानला आपल्या चाहत्यांना अशा अवतारात पाहून हसू आवरता आले नाही.

Updated: May 30, 2018, 01:22 PM IST
VIDEO : चाहत्याने बनवला 'रेस ३'चा Low BUDGET ट्रेलर, सलमान खानला हसू आवरेना! title=

मुंबई : बॉलिवडून स्टार सलमान खान याचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, सलमानच्या चाहत्यांनी 'रेस ३'चा Low BUDGET ट्रेलर बनवला. हा ट्रेलर पाहून सलमान हसायलाच लागला. मात्र, त्याला आपले हसू आवरता येत नव्हते. या ट्रेलर एका टीव्ही शोमध्ये सादर करण्यात आला. यावेळी सलमानने आपल्या आगामी सिनेमाबाबत खूप काही सांगितले. मात्र, हा चाहत्यांचा ट्रेलर खास प्रमोशनसाठी सादर केला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमानला हा ट्रेलर दाखविल्यानंतर तो हसतच सुटला. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक मुलगा विग लावून डेजी शाह प्रमाणे अॅक्शन करताना दिसत आहे. त्याचा डायलॉग 'ऑर बिझनेस इज आर बिझनेस' असा मारताना दिसत आहे. त्यानंतर एक मुलगा सायकलवरुन उतरतो आणि पुन्हा फिरतो, असे दिसत आहे. त्यावेळी हे दृश्य पाहून सलमान हसतच राहतो....