श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज, दमदार टीझर पाहिलात का?

श्रद्धा कपूरचा आगामी सिनेमा लवकच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 2018 मध्ये 'स्त्री' सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली. फुल ऑन पैसा वसूल अशा या कॉमेडी हॉरर सिनेमातीत राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आशातच आता सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं पोस्टर रीलीज करण्यात आलं आहे.

Updated: Jun 14, 2024, 06:15 PM IST
श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज, दमदार टीझर पाहिलात का? title=

'ओ स्त्रि' कल आना' या डायलॉगला आणि सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. कॉमेडी आणि हॉररचं मिश्रण असलेल्या  स्रि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.या सिनेमाचा टीझर काही वेळापूर्वी रिलीज झाला असून अंगावर शहारे आणणाऱ्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. टीझरमध्ये दाखवल्या प्रमाणे मुंज्या आणि स्त्रिची गोष्ट दुसऱ्या भागात उलगडणार आहे. सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनातली दुसऱ्या भागातील उत्सुकता कमालीची वाढली आहे.  

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

स्त्रि' सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. त्याशिवाय सिनेमाच्या दुसऱ्या भागात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना आणि अभिषेक बनर्जी हे पहिल्या भागातील कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत.स्रिच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे दुसरा भागाला ही तितकाच मोठा प्रतिसाद मिळणार का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by $@M (@samthebestest_)

मॅडॉक फिल्मसची निर्मिती असणाऱ्या या सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मॅडॉक फिल्मस आणि श्रद्धा कपूर यांनी इंस्टाग्रामवर स्त्रि'च्या दुसऱ्या भागाचं पोस्टर शेअर केलं. 'ओ फ्रायडे जल्दी आना, मुंज्या और स्त्रि आ रहे है 'असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय राजकुमार रावने स्त्रिच्या पहिल्या भागाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राजकुमार म्हणतो की, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही यांना भरभरुन प्रेम दिल्याबद्दल मनापासून आभार. आता लवकच बिक्की दुसऱ्या भागातून तुम्हाला भेटायला येणार आहे.15 ऑगस्टला सिनेमागृहात स्त्रि आणि मुंज्या तुमच्या भेटीला येणार आहे. असं कॅप्शन देत राजकुमारने स्त्रिच्या दुसऱ्या भागाबद्दल पोस्ट केली. विशेष म्हणजे स्त्रि आणि पुष्पा एकाच वेळी रिलीज होणार असल्यानेऑगस्ट महिना हा प्रेक्षकांसाठी फुल ऑन पैसा वसुल ठरणार आहे. स्त्रिच्या पहिल्या भागाला  प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 2018  मध्ये या सिनेमाने बॉक्सऑफिसवर  कमाई 129.90 कोटी कमाई केली.