अभिनेता राजकुमार राव होणार बाबा? इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

अभिनेता राजकुमार रावने सोशल मीडियावर पोस्ट करून तो आणि त्याची पत्नी पत्रलेखा आई-वडील बनल्याच्या चर्चेला उत्तर दिले. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 30, 2025, 01:50 PM IST
अभिनेता राजकुमार राव होणार बाबा? इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चांना उधाण title=

Rajkummar Rao and Patralekhaa Pregnancy Rumours: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा काही दिवसांपूर्वी 'स्त्री-2' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राजकुमार रावने आपल्या दमदार अभिनयाने लाखो हृदयांवर राज्य केले होते. अभिनेता राजकुमार रावने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. कारण अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा आई-वडील बनल्याच्या अफवा व्हायरल होऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्याने या प्रश्नाचे उत्तर स्वतः पोस्टद्वारे दिले आहे. 

राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा हे बॉलिवूडच्या क्यूट कपल्सपैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाला तीन वर्षे उलटून गेली आहेत. 2021 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. अशा परिस्थितीत हे जोडपे आई-वडील बनल्याच्या अफवा अनेकदा समोर आल्या.

अभिनेत्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय? 

अभिनेता राजकुमार रावने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटले आहे की, काहीतरी खास तयार होत आहे. ते तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यास उत्सुक आहे.
संपर्कात रहा! असं अभिनेत्याने म्हटलं आहे. या पोस्टनंतर चाहते अंदाज लावू लागले आहेत की हे जोडपे लवकरच पालक होणार आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी देखील त्यांना प्रेग्नेंसीबद्दल कमेंट करायला सुरुवात केली आहे. 

मात्र, जेव्हा प्रेग्नेंसीबद्दल कमेंट खूप जास्त झाल्या तेव्हा अभिनेत्याने ती पोस्ट दुरुस्त केली. दुरुस्त करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्ही आता पालक होणार नाहीये. अशा परिस्थितीत, अभिनेत्याने प्रेग्नेंसीबद्दलच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

3 वर्षांपूर्वी अभिनेत्याने केले लग्न 

दरम्यान, या जोडप्याने एका चित्रपटात एकत्र काम केले होते. ज्यावर अभिनेत्याने आतापर्यंत सस्पेन्स कायम ठेवला होता. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 'सिटीलाइट्स' चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याच वेळी, अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x