मुंबई : ब्रिटनच्या राजघराण्यातील 'सर्वात सुंदर' राजकुमारी Amelia Windsor आता 24 वर्षांची आहे. ती अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी तिच्या हेडलाईन्सचं कारण तिची इंस्टाग्राम पोस्ट आहे. ज्यात Ameliaने आपले इनरविअर विकण्याबद्दल बोलली आहे.
विक्रीसाठी ठेवली आपली ब्रा
Amelia Windsor , बेहिशेबी संपत्तीची मालकिण आहे. ती तिचे वॉर्डरोब साफ करण्यासाठी जुने कपडे ऑनलाइन विकते. इन्स्टाग्राम पोस्टनुसार, राजकुमारी तिच्या ब्राशिवाय स्पेगेटी आणि इतर डिझायनर आतील कपडे विकतेय. याशिवाय ती तिचे जुने प्रसिद्ध कपडेही विकते, जे काही कारणामुळे चर्चेत होते. जेव्हा तिचे एक ब्रालेट विक्रीसाठी ठेवले गेलं तेव्हा हे उघड झालं.Amelia Windsor हे ब्रालेट काही वेळापूर्वी एका फंक्शन दरम्यान परिधान केलं होतं.
राजकुमारी असं का करते?
हे उघड करताना Amelia Windsor म्हणाली की, तिचे कपडे डिझायनर आहेत. पण राजघराण्यातील असल्याने तिला तिच्या पब्लिक अपीयरेंसकडे विशेष लक्ष द्यावे लागतं. कित्येकवेळा लोक कपड्यांची पुनरावृत्ती करून त्यांना ट्रोल करायला लागतात. जे योग्य नाही. या कारणांमुळे ती पुन्हा तिच्या कपड्यांची पुनरावृत्ती करत नाही. यामुळे तिच्याकडे कपड्यांचा ढीग जमा झाला आहे. हा साठा साफ करण्यासाठी ती कपडे विकत आहे. ती तिचे कपडे अत्यंत कमी किंमतीत विकत आहे. तसंच, Amelia Windsor यातून मिळणारी कमाई दान करते.
2017 मध्ये मिळाला मोठा पुरस्कार
2017 मध्ये, Amelia Windsorला शाही कुटुंबातील सर्वात सुंदर सदस्याचा टॅग मिळाला. यानंतर, अमेलियाने अनेक सुप्रसिद्ध मॉडेलिंग एजन्सींशी करार केला. राजकुमारी इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते.