अभिनेता अंशुमन विचारेच्या मुलीचं जोरदार भांडण, पाहा गंमतीशीर व्हिडिओ

 मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे हा सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असतो.

Updated: Aug 28, 2021, 05:04 PM IST
अभिनेता अंशुमन विचारेच्या मुलीचं  जोरदार भांडण, पाहा गंमतीशीर व्हिडिओ title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे हा सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असतो. याचबरोबर त्याची पत्नी पल्लवी विचारे ही देखील सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अशुंमन आणि पल्लवी त्याची मुलगी अन्वीचे व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असतात.  नुकताच अन्वीचा असाच एक गोड व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये अन्वी अ‍ॅलेक्सासोबत भांडण करताना दिसत आहे. अन्वी या व्हिडिओत घरी नवीन आणलेल्या अ‍ॅलेक्सासोबत धमाल गप्पा मारताना दिसत आहे. अन्वीला अ‍ॅलेक्सा तिच्या मामाने गिफ्ट केला आहे.

अ‍ॅलेक्सा सोबत अन्वी असं बोलताना दिसत आहे की,  अ‍ॅलेक्सा गाणी गा, याचबरोबर अन्वी अ‍ॅलेक्साला ट्विंकल-ट्विंकल लिटील स्टार आणि बरीच गाणी गायला सांगते. विशेष म्हणजे अन्वी अ‍ॅलेक्सासोबत धमाल करताना दिसत आहे. ती ऐलेक्साला ओरडताना देखील या व्हिडिओत दिसत आहे. याचबरोबर तु कशी आहेस असं देखील अन्वी ऐलेक्साला विचारताना दिसत आहे.

गंमतीशीर गोष्ट म्हणजे अन्वी ज्या पद्धतीने अ‍ॅलेक्साला गाणं म्हणायला सांगतेय ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हे नक्की स्टारकिड अन्वी विचारेचे या आधीही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नेटकरी चिमुकल्या अन्वीच्या या व्हिडीओच्या प्रेमात पडले आहेत. अशुंमनच्या लेकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.