हृतिकला घटस्फोट दिल्यानंतर सुझानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री

हृतिकनंतर सुझान खानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री  

Bollywood Life | Updated: Dec 5, 2021, 04:50 PM IST
हृतिकला घटस्फोट दिल्यानंतर सुझानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान जेव्हा विभक्त झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज सुझान आणि हृतिक वेगळे राहत असले तरी ते दोघे मुलांचं योग्य पद्धतीने सांभाळ करतात. सुझान आणि हृतिक मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात जातात. पण17 वर्षांचं नातं संपवत दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला. हृतिकनंतर सुझान खानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. सुझानच्या मनावर राज्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव अर्सलान गोनी (Arslan Goni) आहे. 

अर्सलान आणि सुझान गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकताचं दोघे गोव्यातून परतले आहेत. वीकेंडला पापाराझीने अर्सलान आणि सुझानला गोव्याहून वेगळे येताना पाहिले. यावेळी अर्सलान गोनीने सुझान खानसोबतच्या डेटच्या अफवांवर मौन सोडले आहे.

Hrithik Roshan की एक्स-वाइफ Sussanne Khan को डेट करने पर Arslan Goni ने कहा, 'हम दोनों काफी दिनों...'

अर्सलानने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, 'मी आणि सुझान चांगले मित्र आहोत. आम्ही आमच्या एका कॉमन मित्राच्या घारी भेटलो होतो. आम्ही एकत्र फिरतो. सुझान एक चांगली व्यक्ती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र आहेत. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत... '

सांगायचं झालं तर अर्सलानने सुझानसोबतच्या नात्याला मैत्रीचं नाव दिलं आहे. हृतिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सुझानचं नाव अर्सलानसोबत जोडलं जावू लागलं. घटस्फोटानंतर दोघे अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर होते. एवढंच नाही तर दोघे प्रचंड दुःखात होते.

यावेळी, दोघांना आपापल्या परीनं आधार देण्याचा प्रयत्न दोघांच्याही नातेवाईकांनी केला. दोघं एकमेकांपासून वेगळे राहून आनंदात राहणार नसतील तर दोघांनीही आपल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, अशी दोघांच्याही नातेवाईकांची आणि चाहत्यांचीही इच्छा होती.