What is ICE theater format : थिएटरमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायला कोणाला आवडत नाही. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची एक वेगळीच मज्जा असते. त्यात जर एखादा चित्रपट हा VFX, अॅक्शन सीक्वेन्स आणि 3D असेल तर मग झालं आपल्याला थिएटमध्ये बघायला येणारी मज्जा ही घरी बसून येत नाही. याशिवाय चित्रपट IMAX फॉरमॅटमध्ये पाहिला असेल. पण आता एक नवीन फॉरमॅट आला आहे. या फॉरमॅटला ICE थिएटर असं म्हणतात. तुम्ही नक्कीच विचार करत असाल की हे काय आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट ICE फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणारा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे. त्यामुळे या फॉरमॅटची चर्चा सुरु झाली आहे. याआधी टॉम क्रूझचा 'टॉप गन: मॅव्हरिक' आणि मार्वलचा 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' देखील ICE फॉरमॅटमध्ये प्रदर्शित झाले आहेत.
ICE फॉर्मेटमध्ये थिएटरचं कसं वातावरण असतं? तर पडद्यावर दाखवण्यात येणाऱ्या सीन्समध्ये स्वत: आपण आहोत असं प्रेक्षकांन वाटतं. यासाठी थिएटरच्या भिंतींवर साइड पॅनेल्स लावले आहेत. ते थिएटर स्क्रीननुसार रंग बदलतात, स्क्रीनवर जे दाखवले जाते तसे वातावरण तयार होते. मात्र, त्यामुळे पाहणाऱ्याचे लक्ष विचलित होऊ नये, याची काळजी घेतली जाते. पडद्यावर घनदाट जंगल दिसत असेल, तर थिएटरच्या भिंतींवरील बाजूच्या भिंतीवर देखील घनदाट जंगलासारखे हिरवे ग्राफिक्स दाखवले जातात. यामुळे असं वाटतं की तुम्ही तेथेच आहात.
ICE थिएटरमध्ये इमर्सिव्ह साऊंड सिस्टिम वापरले जातात. यासाठी पूर्ण थिएटर 3D Doldy Atmos चे 53 स्पीकर बसवले आहेत. 52 वेगवेगळे साऊंड सोर्समधून येणारा हा आवाज प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचतो. यासोबतच 35 अॅम्प्लीफायर्सचा वापर आवाजाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जातो. थिएटर ऑडिटोरियमच्या लांबी आणि रुंदीनुसार स्पीकर आणि सिस्टमची ही संख्या कमी- जास्त होत असते.
जर तुम्हाला थ्रीडी फॉरमॅटमध्ये चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुमची एक तक्रार नक्की असेल कि सामान्य चित्रपटगृहांमध्ये IMAX चित्रपट पाहण्यात जितकी मजा आहे तितकी मजा साधारण चित्रपटगृहांमध्ये नाही. याचं मुख्य कारण म्हणजे स्क्रीनवरील पिक्चर क्वालिटी आणि ब्राइटनेस. ICE Theater फॉरमॅट 60,000 ल्युमन लाइट्स असलेले प्रोजेक्टर वापरले जातात. ज्यामुळे जास्त प्रकाश पडतो आणि स्क्रिन अजून चांगली दिसते. हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही ICE थिएटर फॉरमॅटमध्ये 3D चित्रपट पाहता तेव्हा तो 4K पिक्चर क्वॉलिटीत पाहता येतो. IMAX थिएटरमध्येही जवळपास सेम दिसतं आहे.
ICE थिएटर फॉरमॅट हा चित्रपट पाहण्याचा एक नवीन अनुभव आहे. ICE फॉरमॅट सध्या भारतात दिल्ली-NCR मधील फक्त दोन PVR चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही चित्रपट पाहणार असाल आणि तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये ICE फॉरमॅट असेल, तर तुम्ही नक्कीच एकदा हा अनुभव घ्या.