करीना कपूरचा 'द बकिंघम मर्डर्स' फिल्म हिट की फ्लॉप? पहिल्या दिवसाची कमाई आहे धक्कादायक

'क्रू'च्या यशानंतर अभिनेत्री करीना कपूर दुसऱ्या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतली आहे. नुकताच तिचा 'द बकिंघम मर्डर्स' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 14, 2024, 06:16 PM IST
करीना कपूरचा 'द बकिंघम मर्डर्स' फिल्म हिट की फ्लॉप? पहिल्या दिवसाची कमाई आहे धक्कादायक title=

The Buckingham Murders Box Office Day 1: 2024 च्या सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर महिला राज्य करत आहेत. 'स्त्री 2', 'क्रू' आणि 'Article 370' या सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. नुकताच करीना कपूरचा 'द बकिंघम मर्डर्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

करीना कपूरच्या 'क्रू' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या कॉमेडी चित्रपटात कृती सेनन आणि तब्बूसोबत दिसली होती. आता ती 'द बकिंघम मर्डर्स' चित्रपट घेऊन आली आहे. जो 'क्रू' चित्रपटापेक्षा वेगळा आहे. हंसल मेहता दिग्दर्शित हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच कमी कमाई केली आहे. 

करीनाच्या चित्रपटाने किती केली कमाई? 

करीना कपूरचा 'द बकिंघम मर्डर्स' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी खूपच निराशाजनक आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने लाखोंची घसरण केली आहे. 

रिपोर्टनुसार, करीना कपूरच्या 'द बकिंघम मर्डर्स' या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात बॉक्स ऑफिसवर फक्त 60 लाख रुपयांची कमाई केली आहे. खरे आकडे यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

करीना कपूरचा चित्रपट का चालला नाही? 

प्रत्येक कलाकार त्याच्या चित्रपटाचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशन करत असतो. मात्र, करीना कपूरने तिच्या 'द बकिंघम मर्डर्स' चित्रपटाचे कोणतेही प्रमोशन केले नाही. चित्रपटाचा कोणताही गाजावाजा न करता हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. त्यानंतर चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वात कमी केली आहे. आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट चांगला व्यवसाय करेन अशी अपेक्षा आहे. त्यामुळे वीकेंडला करीनाचा हा चित्रपट किती कमाई करतो हे बघावे लागणार आहे.