मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक पाहिलात का?, मॉडर्न लूकमधील फोटो होताय व्हायरल

Alka Kubal:  सध्या त्यांच्या इन्टाग्रामवरून त्यांचे काही फोटोज हे व्हायरल झाले आहेत. 

Updated: Jan 30, 2023, 04:45 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक पाहिलात का?, मॉडर्न लूकमधील फोटो होताय व्हायरल

Alka Kubal:  माहेरची साडी म्हटलं की ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांची आठवण येतेच. त्याकाळी गाजलेल्या या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास निर्माण केला होता. हा चित्रपट आजही घराघरात पाहिला जातो. त्यामुळे आजही या चित्रपटातील त्यांच्या भुमिकेमुळे अलका कुबल या घरोघरी लोकप्रिय ठरल्या आहेत. टीव्ही आणि चित्रपटातून त्यांनी सोज्वळ (Alka Kubal Maherchi Saree) अशा सुरेख भुमिका केल्या आहेत. सोज्वळ सुनेची जरी त्यांची प्रतिमा असली तरी मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्या फारच मॉडर्न आणि वेस्टर्न कपड्यांमध्येही सुरेख दिसतात. त्या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या फोटोज कायमच चर्चा होत असते. सध्या त्यांच्या इन्टाग्रामवरून त्यांचे काही फोटोज हे व्हायरल झाले आहेत. (what marathi actress akala kubal viral photos her life offscreen)

23 सप्टेंबर 1963 ला अलकाताईंचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलका कुबल आठल्ये म्हणून त्या आजही ओळखल्या जातात. मध्यंतरी एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'सुमारे पाच वर्षे मी अनेक भूमिका नाकारल्या. काही वेगळे प्रयत्न केले. त्यात काही चालले नाहीत, तर काही रसिकांपर्यंत पोहोचले नाहीत. मला टर्निंग पॉइंट मिळाला, तो डॉ. सलील कुलकर्णी यांच्या 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटापासून. मी वास्तवात जशी आहे, तशीच आई मी या चित्रपटात साकारली. 'मल्टीटास्कर' (Marathi Movies Alka Kubal) आई साकारताना मजा आली.' त्यामुळे चित्रपटातून त्या विविध भुमिका या साकारत असतात.

त्यांना दोन मुली आहे. एकीचे नावं ईशानी आहे जी पायलट आहे आणि दुसरीचे नावं हे कस्तुरी आहे. ती सध्या फिलिपाइन्सला एमबीबीएस करतेय. तिला डर्मिटोलॉजिस्ट व्हायचं आहे. 'लेक चालली सासरला', 'कमाल माझ्या बायकोची' आणि 'तुझ्या वाचून करमेना' अशा चित्रपटातूनही त्यांना वेगळी ओळख मिळाली.

सध्या त्यांचेही काही फोटोज हे चर्चेचा विषय़ ठरले आहेत. त्यांच्या इन्टाग्राम अकांऊटवरून त्यांनी हे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या बाहेरगावी फिरताना म्हणजेच परदेशात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या फोटोजना खूप लाईक्सही मिळत आहेत. सध्या त्यांच्या एका फोटोची सगळीकडेच चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलका कुबल यांनी आता टेलिव्हिजनमध्येही काम करायला सुरूवात केली आहे. त्यांच्या मालिकांनाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. सध्या त्यांचे हे फोटोज चर्चेचा विषय ठरले आहेत.