मुंबई : आपल्याला माहितच आहे गेल्या अनेक दिवसांपासून सोनाली बेंद्रे न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. याच ठिकाणी अभिनेता अनुपम खेर आपला नवा शो 'न्यू एम्स्टर्डम' चं शुटिंग करत आहेत. अशावेळी एकाच ठिकाणी दोन कलाकार असतील तर त्यांची भेट नक्की असते. अशातच अनुपम खेर यांनी सोनालीच्या तब्बेतीची माहिती घेण्यासाठी गेले. यानंतर अनुपम खेर यांनी सोनालीच्या सकारात्मक विचाराबाबत खूप कौतुक केलं.
अनुपम खेरने याबद्दल बोलताना सांगितलं की, सोनालीचं जितकं कौतुक केलं जाईल तेवढं कमी आहे. तिच्यासोबत असल्यामुळे आपल्याला सतत सकारात्मक वाटत असते. पुढे अनुपम यांनी सांगितलं की, आमच्यात पैज लागली आहे. ती पैज अशी की, सगळ्यात अगोदर घरी कोण जाणार? कारण अनुपम खेर आपल्या शोच्या शुटिंग करता जवळपास 4 महिने न्यूयॉर्कमध्ये राहणार आहे.
आयएएनएसशी बोलताना अनुपम म्हणाले की, सोनाली एक धाडसी आणि साहसी मुलगी आहे. कठीण परिस्थितीतही सोनाली आपल्या जीवनात खूप धाडसाने उभी राहिली आहे. पुढे अनुपम खेर म्हणाले की, मला सोनालीला आध्यात्मिक ताकद द्यायची आहे. ज्यामुळे मी रोज सकाळी तिच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तसेच कायम तिला भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत असल्यामुळे सोनालीला खूप चांगल वाटेल.