बॉलिवूडमधल्या या लोकप्रिय अभिनेत्रीचं १६ व्या वर्षी लैंगिक शोषण

अनेकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रेखा.... 

Updated: Dec 15, 2017, 08:07 PM IST
बॉलिवूडमधल्या या लोकप्रिय अभिनेत्रीचं १६ व्या वर्षी लैंगिक शोषण

मुंबई : अनेकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रेखा.... 

जिने आजही आपल्या अभिनय आणि चिरतरूण सौंदर्याने घायाळ चाहत्यांना घायाळ केलं आहे. आजही रेखाचे जुने सिनेमे असोत वा नवे सिनेमे प्रेक्षक त्यावर फिदा होतातच. रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं.त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही. 

प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे. त्यापैकी महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे. बिग बींवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि किंबहुना आहे. मात्र हे वास्तव त्यांनी आजवर कधीही स्वीकारलं नाही.

'रेखा- अन अनटोल्ड स्टोरी' 

 रेखा यांचा हा जीवन प्रवास वर्णन करणारं पुस्तक यासिर उस्मान यांनी लिहलं आहे.'रेखा- अन अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात यासिर यांनी रेखा यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे जगासमोर आणले आहेत.यापैकी एक खुलासा ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टारसह स्क्रीन शेअर करणा-या रेखा यांच्या जीवनातील हे रहस्य कुणालाच माहिती नव्हतं. 
 
 मात्र या पुस्तकाच्या निमित्ताने हे रहस्य जगासमोर आले आहे.या पुस्तकातील संदर्भांनुसार रेखा यांना वयाच्या १६ व्या वर्षी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला.'अंजाना सफर' या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी हा प्रकार घडल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे.या सिनेमाच्या दिग्दर्शकानं रेखाला फसवलं होतं. त्यांना न सांगताच रोमँटिक सीन दिग्दर्शकानं सिनेमात टाकला होता.सिनेमातील सीन बदलण्यात आल्याची रेखा यांना बिल्कुल कल्पनाही नव्हती.
 
 सीनच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शकाने ऍक्शन म्हणताच अभिनेता विश्वजीतने रेखा यांना आपल्या मिठीत घेतलं आणि त्यांना किस करण्यास सुरुवात केलं.या सगळ्याची रेखा यांना बिल्कुल कल्पना देण्यात आली नसल्याने नेमकं काय सुरु आहे हे त्यांना कळलं नाही.हा किसिंग सीन जवळपास ५ मिनिटे सुरु होता.काही तरी वेगळंच सुरु असल्याचं मग रेखा यांना जाणवलं.त्यांनी स्वतःला विश्वजीत यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला.मात्र विश्वजीत यांनी रेखा यांना सोडलं नाही. मात्र या सगळ्या प्रकारानंतर रेखा यांना समजलं की त्या लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत.