पत्नीसोबत नात तुटल्यानंतर आमिरला वेदना असह्य; एक्स पत्नीबद्दल सांगितली 'ही' मोठी गोष्ट

सुरुवातीला या जोडप्याने आपल्या बिघडत चाललेल्या नात्यावर बराच वेळ मौन पाळलं होतं

Updated: Oct 8, 2022, 04:10 PM IST
पत्नीसोबत नात तुटल्यानंतर आमिरला वेदना असह्य; एक्स पत्नीबद्दल सांगितली 'ही' मोठी गोष्ट    title=

मुंबई : आमिर अली आणि संजीदा शेख यांची लव्हस्टोरी ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय लव्हस्टोरी मानली जाते. जरी या कपलने देखील कोणाचं तरी लक्ष वेधून घेतलं आहे असं दिसलं तरी. आमिर अली आणि संजीदा शेख यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेसारखी होती. ज्याचा असा परिणाम होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

सुरुवातीला या जोडप्याने आपल्या बिघडत चाललेल्या नात्यावर बराच वेळ मौन पाळलं, त्यानंतर त्यांनी जगासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. या लेखाच्या माध्यमातून या जोडप्याच्या सुंदर नात्यात दुरावा निर्माण करणारं नेमकं घडलं तरी काय ते जाणून घेऊया.

एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा आमिर अलीने खुलासा केला होता की, तो आपल्या मुलीला भेटू शकत नाही, तेव्हाच त्याने संजीदासोबतचं खराब नातं जगासमोर उघड केलं. यादरम्यान आमिर म्हणाला होता की, आम्ही आमच्या आयुष्यातील खूप सुंदर क्षण एकत्र जगलो आहोत. अशा परिस्थितीत जाहीरपणे काहीही बोलून या नात्याला बदनाम  मला करायचं नाही.

आमिर आणि संजीदा यांचं लग्न २०१२ साली झालं होतं. त्यांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव आयरा आहे आणि तिचा जन्म 2020 मध्ये झाला होता. आमिर आणि संजीदाच्या विभक्त झाल्याची बातमी समोर येताच चाहते चक्रावले.

आमिर अलीने संजीदाबद्दल सांगितलं
त्यानंतर दुसऱ्या एका मुलाखतीत आमिर म्हणाला होता की, 'ही खूप गंभीर बाब आहे. मला याबद्दल बोलायचं नाही आणि मला दुसरा कोणताही खेळ खेळायचा नाही. पण नेहमीच माणसालाच दोष दिला जातो ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

अभिनेता पुढे म्हणाला की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच मौन बाळगलं आहे. कारण ज्या व्यक्तीसोबत मी माझ्या आयुष्यातली इतकी वर्षे घालवली ती व्यक्ती आदरास पात्र आहे. अशावेळी मी काहीही बोलणार नाही. मी फक्त प्रार्थना करेन की ती आनंदी राहो आणि आशा करतो की आयराची देखील काळजी घेतली जाईल.