जेव्हा अमिताभसाठी राजेश खन्नाने रद्द केली शूटींग

 अमिताभ हे राजेश खन्नांसोबत त्यांचा बर्थ डे सेलिब्रेट करू इच्छित होते.

Updated: Dec 29, 2017, 10:07 AM IST
जेव्हा अमिताभसाठी राजेश खन्नाने रद्द केली शूटींग  title=

मुंबई : बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत वेळ घालविण्यासाठी इतर अॅक्टर्सना वेळ घ्यावा लागायचा. २९ डिसेंबरला पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या राजेश यांचे खरे नाव जतिन खन्ना होते. पण बॉलीवूडमध्ये एंन्ट्री घेण्याआधी त्यांनी हे नाव बदलले. त्यांचे असे अनेक किस्से आहेत. 

अमिताभ यांच्या स्ट्रगलचे दिवस  

'आनंद' सिनेमात राजेश खन्नांसोबत दिसलेले अमिताभ तेव्हा स्ट्रगल करत होते. २८ डिसेंबरला अमिताभ आपले को-अॅक्टर रादेश खन्नांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. अमिताभ हे राजेश खन्नांसोबत त्यांचा बर्थ डे सेलिब्रेट करू इच्छित होते. २९ डिसेंबर ऐवजी ते २८ डिसेंबरला सकाळीच राजेश यांच्या घरी पोहोचले. 

अमिताभ यांची इच्छा 

राजेश खन्ना यांनी अमिताभ यांना एवढ्या सकाळी येण्याचे कारण विचारले. 'आज तुमचा वाढदिवस आहे मी तुम्हाला सरप्राइज देण्यासाठी आलोय.' असे अमिताभ यांनी सांगितले. अमिताभ यांना संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवायचा होता. 

शूटींग रद्द 

त्यांचा वाढदिवस २९ डिसेंबरला असतो पण २८ तारखेचा संपूर्ण दिवस त्यांनी अमिताभ यांच्यासोबत घालविला.  राजेश खन्ना यांनी त्यादिवशीची आपली शुटींग रद्द केली आणि अमिताभ यांना पूर्ण वेळ दिला.