सुनील ग्रोव्हरने महिनाभर स्वत:ला खोलीत घेतलं होतं कोंडून; या गोष्टीचा बसला होता धक्का!

द कपिल शर्मा शोमधून सुनील ग्रोव्हरला खरी ओळख मिळाली. सुनील ग्रोव्हरला इंडस्ट्रीत येऊन २ दशकांहून अधिक काळ लोटला आहे. कपिल शर्मा या शोमध्ये एट्री घेतल्यानंतर सुनिलने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

Updated: Mar 27, 2023, 08:52 PM IST
सुनील ग्रोव्हरने महिनाभर स्वत:ला खोलीत घेतलं होतं कोंडून; या गोष्टीचा बसला होता धक्का! title=

मुंबई : अभिनेता सुनिल ग्रोवर हा त्याच्या कॉमेडी टाईमिंगने सगळ्यांना खूप हसवत असतो. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी त्याला मानलं जातं. आपल्या कॉमेडी अभिनयाने पोटधरुन हसायला भाग पाडणारा अभिनेता एकेकाळी खूप त्रासात होता. एकेकाळी त्याने सगळ्या आशा गमावल्या होत्या. रातोरात शोमधून बाहेर काढून टाकल्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसला होता. आणि या धक्क्यातून त्याला सावरता येत नव्हतं. अशावेळी त्याने स्वत:ला  खोलीत कोंडून घेतलं होतं. 

सुनील ग्रोव्हरने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तीन दिवस शूट केल्यानंतर त्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं. हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा संघर्षाचा काळ होता. निर्मात्यांनी त्याला न सांगताच शोमधून बाहेकर काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याला ही माहिती दुसरीकडून मिळाली. यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसला आणि स्वत:ला त्याने खोलीत कोंडून घेतलं. पण काहीच दिवसात त्याने स्वत:च स्वत:ला बाहेर काढलं. महिनाभरानंतर स्वतःला दुसरी संधी द्यायची अशी जिद्द त्याच्या आतून त्याला आली, तो वेगळा विषय झाला.
 
द कपिल शर्मा शोमधून सुनील ग्रोव्हरला खरी ओळख मिळाली. सुनील ग्रोव्हरला इंडस्ट्रीत येऊन २ दशकांहून अधिक काळ लोटला आहे. कपिल शर्मा या शोमध्ये एट्री घेतल्यानंतर सुनिलने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र, कपिलसोबत झालेल्या भांडणानंतर त्याने या शोचाही निरोप घेतला. यानंतर तो ओटीटीवरील अनेक वेब सीरिजमध्येही दिसला आहे. तांडव आणि सूर्यफूलमधील त्यांच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याचबरोबर सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या आधारे एखाद्याच्या क्षमतेचं परीक्षण केलं जाऊ नये. यावरही सुनील ग्रोव्हरने वक्तव्य करत सांगितलं की, ''मी सर्वांना विनंती करतो की तुमचे किती फॉलोअर्स आहेत, तुमच्या किती कमेंट्स आहेत यावर कृपया स्वतःचा जज करू नका. कारण हेच तुमची स्वतःची किंमत ठरवेल. कृपया असं करू नका. यामुळे अनेकांना डिप्रेशनमध्ये जाताना मी पाहिलं आहे.