कतरिना कैफ प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या टीमचं मोठं वक्तव्य

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. 

Updated: May 13, 2022, 09:21 PM IST
कतरिना कैफ प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या टीमचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. सध्या बॉलिवूडमधील पॉवर कपल क्वालिटी टाइम स्पेंन्ड करत आहे आणि हे कपल सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. नुकतंच दोघांनी न्यूयॉर्कमधील अनेक फोटोही शेअर केले आहेत. पण यादरम्यान कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या बातम्या सतत येत आहेत आणि ती दोन महिन्यांची प्रेग्नंट असल्याचंही बोललं जात आहे. पण आता तिच्या टीमने कतरिना कैफशी संबंधित या बातमीबद्दल स्पष्टपणे बोलले आहे आणि त्याबद्दल केल्या जात असलेल्या अटकळ बाजूला ठेवल्या आहेत.

दिलेल्या एका मुलाखतीत, कतरिना कैफच्या टीमने सांगितलं की, अशी कोणतीही गुडन्यूज नाही हे जाणून आम्हा सर्वांना फार आनंद झाला नाही. ती प्रेग्नंट नाही, सध्या ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि तिच्या वैवाहिक आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसांचा आनंद घेत आहे. म्हणूनच पती-पत्नी आजकाल न्यूयॉर्क फिरत आहेत आणि स्वादिष्ट पदार्थांपासून ते सुंदर दृश्यांचा आनंद घेत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कतरिना कैफकडे एकामागून एक चित्रपटांची रांग लागली आहे. कतरिना कैफचा आगामी चित्रपट टायगर 3 आहे, ज्यामध्ये ती सलमान खानसोबत दिसणार आहे. यानंतर ती मेरी ख्रिसमसमध्येही दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे फोन भूत हाही सिनेमा आहे. त्याचबरोबर सारा अली खानसोबत विकी कौशलच्या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच संपलं आहे. गोविंदा मेरा नाम आणि सॅम मानकेशॉप मध्येही तो दिसणार आहे.