सलमान खानच्या 'रेस 3' ला शुभेच्छा देताना सिल्वेस्टरने केली 'ही' मोठी चूक !

सलमान खान यंदा ईदच्या मुहुर्तावर 'रेस3' हा चित्रपट घेऊन येणार आहे. 

Updated: Mar 23, 2018, 04:38 PM IST
सलमान खानच्या 'रेस 3' ला शुभेच्छा देताना सिल्वेस्टरने केली 'ही' मोठी चूक ! title=

मुंबई : सलमान खान यंदा ईदच्या मुहुर्तावर 'रेस3' हा चित्रपट घेऊन येणार आहे. नुकातच सलमान खानने या चित्रपटातील त्याचा लूक सोबतच त्याच्या सहकलाकारांचा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सलमान नियमित एका व्यक्तिरेखेची चाहत्यांसोबत ओळख करून देत आहे. 

परदेशातून कौतुकाचा वर्षाव  

सलमान खानच्या 'रेस 3' या आगामी अ‍ॅक्शनपटाला परदेशातून शुभेच्छा मिळत आहेत. नुकतेच हॉलिवूडचा कलाकार सिल्वेस्टन स्टेलन या अभिनेत्याने सलमान खानच्या 'रेस 3'ला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर 'रेस 3' चं पोस्टर शेअर केलं आणि ट्विटरवर ते शेअर करण्यात आले आहे.

 

सलमानऐवजी बॉबी देओलचं पोस्टर झालं पोस्ट  

सिल्वेस्टन स्टेलनने सलमान खानला 'रेस 3'साठी शुभेच्छा देताना मात्र एक चूक केली. सिल्वेस्टनने सलमान खानऐवजी बॉबी देओलचे पोस्टर शेअर केले. यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली. चूक लक्षात आल्यानंतर सिल्वेस्टनने फोटो डिलिट केला. 

ट्विटरच्या माध्यमातून व्यक्तिरेखांची ओळख 

 

ट्विटरच्या माध्यमातून सलमान खानने जॅंकलीन फर्नांडिस, डेजी शहा, बॉबी देओलच्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिली आहे. यानंतर आज सकिब सलीमच्या व्यक्तिरेखेचीदेखील ओळख करून देण्यात आली आहे. डेजी शाहची 'रेस 3' मधील ओळख देताना सलमान खान म्हणाला ...

अ‍ॅक्शन फिल्मचं शूटींग परदेशामध्ये 

रेस 3 चित्रपटामध्ये काही अ‍ॅक्शन सिक्वेन्स  आहेत. या सिक्वेन्सचं शूटिंग अबुधाबीमध्ये सुरू आहे. यासाठी सलमानसह सारेच कलाकार मेहनत आणि रिहर्सल करत आहेत.  

 15 जूनला रीलीज होणार चित्रपट  

कोरिओग्राफर रेमो डिसुजा 'रेस 3' चं दिग्दर्शन करणार आहे. 'रेस'च्या सिक्वेलमध्ये सलमान खान पहिल्यांदा झळकणार आहे. अभिनेते अनिल कपूर यांनीदेखील ट्विट करून 'सिकंदर हा पहिला रेसर...' असे म्हणत ट्विट केलं आहे. सलमान खानने देखील या आठवड्यात 'रेस3' च्या परिवारातील मंडळीशी तुमची ओळख करून देतो असे ट्विटरवर लिहले आहे.