Suyash Tilak Engaged : कोण आहे सुयश टिळकची भावी पत्नी?

सुयश टिळकने या व्यक्तीला निवडलं आपलं जोडीदार 

Updated: Jul 7, 2021, 07:26 AM IST
Suyash Tilak Engaged : कोण आहे सुयश टिळकची भावी पत्नी?  title=

दक्षता ठसाळे, झी मीडिया, मुंबई : अभिनेता सुयश टिळकने (SuyashTilak)  नुकतेच साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. सुयशने आयुषी भावेसोबत (AayushiBhave) साखरपुडा केला आहे. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्याने याबाबत ऑफिशिअल अनाऊन्समेंट केली आहे. (Who is Aayushi Bhave, Suyash Tilak Fiancee ) सुयशच्या या फोटोखाली अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

पण सुयश टिळकची जोडीदार नेमकी कोण आहे? अशी चर्चा रंगली आहे. पहिल्यांदाच सुयशसोबत या व्यक्तीला पाहण्यात आलंय. (Suyash Tilak Get Engaged : सुयश टिळकचा साखरपुडा झाला... या व्यक्तीसाठी शेअर केली खास पोस्ट)

कोण आहे आयुषी भावे? 

आयुषी भावे ही अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर आहे. 

युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली. 

आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार आहे. 

आयुषी भावेचा एक लावणीचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. 'या गावचं की त्या गावचं' या लावणीचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. 

सुयश टिळक सध्या झी मराठीवरील 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत शंतनुची भूमिका साकारत आहे. रिल लाईफमध्ये सुद्धा नुकतंच सुयशचं लग्न झालं आहे. तर आता रिअल लाईफमध्ये तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

साखरपुड्याला सुयश-आयुषीचा हटके लूक 

सुयशने जून महिन्याच्या सुरूवातीलाच साखरपुडा केला आहे. त्याने आज आयुषीच्या वाढदिवसादिवशी ही खास बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  सुयश टिळकने साखरपुड्याच्या सोहळ्याला खूप सुंदर अटायर केला आहे. यावेळी त्याने ऑफ-व्हाईट रंगाचा कुर्ता आणि वेस्टी घातलं होतं. तर आयुषी भावेने हिरव्या रंगाची ट्रेडिशनल साडी नेसली आहे.