प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त, कोण आहे ती सौंदर्यवती?

कोण आहे ती सौंदर्यवती? जिने कमावाली कोट्यवधींची माया  

Updated: Jul 23, 2022, 02:23 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त, कोण आहे ती सौंदर्यवती? title=

कोलकाता :  पश्चिम बंगालमध्ये EDकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत राज्यातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरावर छापा टाकून 20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.  ममता सरकारमधील अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या  कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेत. ज्या महिलेच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तिच्याबद्दल जाणून घेऊ. कोण आहे  अर्पिता मुखर्जी,  जिच्याकडून 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 

अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची सहकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अर्पिता मुखर्जीने बंगाली अभिनेता प्रोसेनजीत आणि जीत यांच्यासोबत मुख्य भूमिकांसह काही सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्री भूमिका देखील पार पाडली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्पिता पार्थ मुखर्जींसोबत अनेकवेळा राजकीय कार्यक्रमांमध्येही दिसली आहे. याशिवाय ती पार्थ चॅटर्जींसोबत प्रचार करतानाही दिसली होती. 

दक्षिण कोलकाता येथील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीच्या समारंभात दोघे एकत्र दिसले होते. रिपोर्ट्सनुसार, अर्पिता गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण कोलकाता येथे एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहे. 

ईडीने अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला, जेथे ईडीच्या पथकाने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. "शोधादरम्यान, ईडीने पार्थ चॅटर्जींची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या राहत्या घरातून सुमारे 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली," असं ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.

अर्पिता चटर्जी यांच्याव्यतिरिक्त EDने शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसेच आमदार माणिक भट्टाचार्य तसेच अन्य काही व्यक्तींवरही कारवाई केली आहे. 

पश्चिम बंगालमधील SSC घोटाळ्यामध्ये सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.