मिस इंडियाचा Crown कोणाच्या पदरी? 31 फायनलिस्टचे भवितव्य ठरवतील हे सेलेब्स

फेमिना मिस इंडिया 2022 चा ग्रँड फिनाले आज 3 जुलै रोजी होणार आहे. 

Updated: Jul 3, 2022, 10:41 PM IST
मिस इंडियाचा Crown कोणाच्या पदरी? 31 फायनलिस्टचे भवितव्य ठरवतील हे सेलेब्स  title=

मुंबई : फेमिना मिस इंडिया 2022 चा ग्रँड फिनाले आज 3 जुलै रोजी होणार आहे. मिस इंडिया स्पर्धेचा हा ग्रँड फिनाले  मुंबईतील जिओ सेंटर येथे होणार आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या 31 अंतिम स्पर्धकांचे भवितव्य रविवारी रात्री निश्चित होणार आहे.  मिस इंडिया 2022 च्या या फायनलमध्ये काय खास असणार आहे याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

फायनलिस्टच्या भवितव्याचा हे सेलिब्रिटी निर्णय घेतील
मिस इंडिया 2022 च्या फिनालेसाठी निवडलेल्या 31 अंतिम स्पर्धकांचं भवितव्य या चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या हातात आहे. वास्तविक, मिस इंडिया 2022 च्या ग्रँड फिनालेमधील न्यायाधीशांची पॅनेल खूप मोठी आहे. यात मलायका अरोरा, नेहा धुपिया, डिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शम्मक दावर यांसारख्या मनोरंजन जगतातील सेलिब्रिटींचा समावेश आहे. इतकंच नाही तर भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील या पॅनेलमध्ये आहे.

31 फायनलिस्ट मिस इंडियाच्या साजसाठी स्पर्धा  
मिस इंडिया 2022 चा खिताब जिंकण्यासाठी 31 स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या 31 फायनलिस्टमध्ये देशातील विविध राज्यांमधून विजेते मॉडेल निवडण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, यावेळी फेमिना मिस इंडिया 2022 चा मुकुट कोणत्या सौंदर्यवतीच्या डोक्यावर सजणार हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे.  या सामन्यात झारखंडची रिया तिर्की हिच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे.