गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सारं काही अलबेल नसल्याचं बोललं जातं. अनंत अबांनी यांच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसले होते. पण, ऐश्वर्या आण आराध्या या मात्र बच्चन कुटुंबीयांसोबत दिसल्या नव्हत्या. त्यामुळं बच्चन कुटुंबीयांमध्ये काही वाद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच अभिषेक बच्चनने घटस्फोटासंबंधी एक पोस्ट लाइक केल्याने तर अधिकच चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र, अभिषेकने इन्स्टाग्रामवरील लाइक केलेली ती पोस्ट ज्या व्यक्तीची आहे त्याचे ऐश्वर्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत.
लेखिका हिना खंडेलवाल यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ग्रे डिव्होर्सच्या वाढत्या प्रकरणांबाबत सविस्तर लिहण्यात आलं होतं. जिथे पती-पत्नी यांचे मार्ग वेगळे होतात त्यासंदर्भात यात लिहिण्यात आलं होतं. मात्र आता एका रेडिट पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अभिषेकने ही पोस्ट लाइक केलीये त्याचे कारण ऐश्वर्या आणि त्याचा घटस्फोट होतोय हे नाहीये. तर, ऐश्वर्याचा जुना आणि जवळचा मित्र जिरक मार्कर याने हा लेख लिहिण्यास योगदान दिलं आहे. ज्याचा इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्येही उल्लेख करण्यात आला आहे.
जिरक एक मेंटल हेल्थ स्पेशालिट आहे आणि ऐश्वर्याचा जवळचा मित्र. दोघांनी फारुख शेख यांचा कार्यक्रम जीना इसी का नाममध्ये एकत्र कामदेखील केले आहे. तिथे मैत्रीसंदर्भात दोघांनी गप्पादेखील केल्या होत्या. आता ऐश्वर्याच्या जवळच्याच मित्रांने लिहलेल्या पोस्टला अभिषेकने लाइक केले आहे. त्यामुळं खरंच ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अभिषेकने या पोस्टला लाइक केल्यामुळं लोकांनी तो ऐश्वर्यापासून घटस्फोट घेत असल्याचा अर्थ काढला होता. मात्र, अभिषेक आणि जिरक एकमेकांना फॉलो करतात. मात्र, ऐश्वर्या तिच्या मित्राला फॉलो करत नाही. ती इन्स्टाग्रामवर फक्त एका व्यक्तीला फॉलो करते तो म्हणजे पती अभिषेक बच्चन. ती अमिताभ बच्चन यांना देखील फॉलो करत नाही.
दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात नणंद श्वेता बच्चन नंदा आणि जया बच्चन यांच्यामुळं दुरावा यांच्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर श्वेता नंदा यांच्यावर टीकादेखील केली जात आहे. मात्र अद्याप बच्चन कुटुंबीयांकडून यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.