Rekha : रेखाच्या नवऱ्याने का संपवल आयुष्य...चिठ्ठीत लिहिलं होतं 'ते' कारण...

रेखा यांचे खाजगी आयुष्य कोणत्याही सुपरहिट चित्रपटापेक्षा कमी नाही.

Updated: Oct 6, 2022, 09:56 PM IST
Rekha : रेखाच्या नवऱ्याने का संपवल आयुष्य...चिठ्ठीत लिहिलं होतं 'ते' कारण... title=
Why did Rekhas husband end his life In the note it was written because nz

मुंबई: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा अविस्मरणीय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या आजही त्यांच्या सौंदर्याने लाखो चाहत्यांना घायाळ करतात. त्यांचे चित्रपट, वेषभूषा या सगळ्यांची तर नेहमीच चर्चा होताना दिसते. पण त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी चाहत्यांना भयंकर उत्सुकता लागलेली असते. (Why did Rekhas husband end his life  In the note it was written because nz)

रेखा यांचे खाजगी आयुष्य कोणत्याही सुपरहिट चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांचे चित्रपट, त्यांनी घेतलेले आजवर निर्णय, त्यांचे वैयक्तिक आयुष्य,  प्रेम, लग्न, नवऱ्याची आत्महत्या या अनेक गोष्टींमुळे त्या नेहमीच चर्चेत असत. त्यांचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा आजवर चाहत्यांच्या तोडांत आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याची कबूली अजूनही मीडियासमोर दिली नाही. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्या चर्चा थांबल्या. मग रेखा यांनी देखील आयुष्यात पुढे जायायचा निर्णय घेतला. 

1990 मध्ये उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी रेखा यांनी लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांतच दोघांमध्ये होणारे वाद पुढे येऊ लागले. माहितीनुसार लग्नानंतर मुकेश डिप्रेशनमध्ये गेल्याचे म्हटले जात होते.

लग्नाच्या ११ महिन्यातच उद्योगपती मुकेश अग्रवाल यांनी रेखा यांच्या ओढणीने गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या करताना त्यांनी एक चिठ्ठी लिहीली होती. त्या चिठ्ठीत रेखा याच्यांविषयी अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे, 'मी माझ्या संपत्तीतून रेखाला काहीही देणार नाही. ती तिचे वैभव स्वत: उभं करू शकते.

मुकेश यांच्या आत्महत्येनंतर रेखा यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मुकेश यांच्या आत्महत्येला रेखा जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

परंतु मुकेश अग्रवाल यांच्या भावाने एका मुलाखतीत रेखांवरील आरोप खोटे आहेत असं सांगितले होते. रेखा यांनी मुकेशसोबत पैशांसाठी लग्न केलं नव्हतं, रेखा यांनी कीधीही आमच्याकडं कोणत्याच गोष्टीची मागणी केली नव्हती. असं त्या मुलाखतीत मुकेश यांच्या भावाने स्पष्ट केले.