सलमान खानने जगासमोर अर्जुन कपूरच्या वडिलांना का म्हटलं 'थँक्यू'?

 सलमान खानने असं काही केलं ज्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. 

Updated: Jun 7, 2022, 04:28 PM IST
सलमान खानने जगासमोर अर्जुन कपूरच्या वडिलांना का म्हटलं 'थँक्यू'? title=

मुंबई : मलायका आणि अर्जुनचे नातं समोर आल्यापासून सलमान खान हा कपूर कुटुंबापासून दूर आहे. पण अलीकडेच सलमान खानने असं काही केलं ज्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. सलमान खानने अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर यांचे सर्वांसमोर आभार मानले आहेत.

सलमान म्हणाला थँक्यू
आयफा २०२२ मध्ये सलमान खान मन मोकळेपणाने बोलला. ज्यांनी-ज्यांनी त्याला वर्षानुवर्षे पाठिंबा दिला आणि त्याला त्याच्या कामात सर्वात जास्त यशस्वी अभिनेता बनवलं त्यांनी त्यांचे आभार मानले. अर्जुन कपूरचे वडील आणि निर्माता बोनी कपूर यांचंही नाव या लोकांमध्ये सामील होतं.

सलमान खानने आयफा 2022 मध्ये बोनी कपूरचे आभार मानले आणि सांगितलं की,  त्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला. निर्माता बोनी कपूर यांनी सलमान खानला 'वॉन्टेड' नावाचा चित्रपट दिला. ज्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर परतला. या चित्रपटानंतर सलमान खानने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि एक नवीन यशोगाथा रचली.

IIFA 2022 मध्ये, सलमान खानने बोनी कपूर यांचे आभार मानले आणि सांगितलं की, जेव्हा मी एका वाईट टप्प्यातून जात होतो. तेव्हा बोनी कपूरजींनी मला मदत केली. बोनी कपूरजींनी मला 'वॉन्टेड' सारखा चित्रपट दिला. ज्यामुळे मी बॉक्स ऑफिसवर कमबॅक केलं. वॉन्टेड व्यतिरिक्त बोनीजींनी मला 'नो एंट्री' नावाचा चित्रपटही दिला. जो अनिल कपूरचा कमबॅक चित्रपट होता. बोनी जी यांनी मला नेहमीच मदत केली आहे. त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.

सलमान जुन्या गोष्टी विसरला?
सलमान खान सुरुवातीपासूनच बोनी कपूर यांच्या कुटुंबाच्या जवळ आहे. इतकंच नाही तर सलमान खान आणि अनिल कपूर यांच्यातही चांगली मैत्री आहे. एवढेच नाही तर अर्जुन कपूरला लॉन्च करण्यात सलमान खानचा मोठा हात होता. अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की, अर्जुन कपूरला सलमाननेच जिम ट्रेनिंग दिली होती.

काही काळापूर्वी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या जवळीकीची बातमी आली तेव्हा भाईजानचा पारा थोडा चढला होता पण सलमान खानने जुन्या गोष्टींवर चिखलफेक करून आयुष्यात पुढे गेल्याचे दिसते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x