शूटच्या पहिल्याच दिवशी लोकप्रिय अभिनेत्रीला का घ्यावी लागली गर्भनिरोधक गोळी?

अभिनेत्री होणं सोपन नसतं....   

Updated: Feb 4, 2022, 03:14 PM IST
शूटच्या पहिल्याच दिवशी लोकप्रिय अभिनेत्रीला का घ्यावी लागली गर्भनिरोधक गोळी?  title=

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये यश मिळवण्यासाठी अभिनेत्रींना अनेक अव्हानात्मक भूमिका साकाराव्या लागतात. मालिका ते बॉलिवूड असा प्रवास करताना अभिनेत्रींच्या वाट्याला अनेक चांगले वाईट प्रसंग येतात. पण अशा परिस्थितीतही अभिनेत्री मागे वळून पाहात नाहीत.  अशा अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका मदान. राधिकाने फक्त मलिकांमध्येचं नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. 

पण शुटिंगच्या सुरूवातीला राधिकाला अनेक  गोष्टींचा सामना करावा लागला. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान राधिकाने तिच्या शूटींगचा एक किस्सा सांगितला आहे. सध्या तिने सांगितलेला किस्सा तुफान चर्चेत आहे.                                

राधिका म्हणाली, 'माझा शुटिंगचा पहिला दिवस होता. तेव्हा मला गर्भनिरोधक गोळी खरेदी करावी लागली. मला दिग्दर्शकाने गोळी खरेदी करण्यास सांगितली, तेव्हा मला अश्चर्य वाटलं. पण माझ्या सिनेमातील तो पहिला शॉट होता...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती पुढे म्हणाली, 'शुटिंगनंतर मी माझ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी गेली. तेव्हा त्यांनी माझ्याकडे गर्भनिरोधक गोळी पाहिली. त्यांना धक्का बसला. माझे वडील फक्त त्या गोळ्यांकडे बघत राहिले.'

यावेळी राधिकाने करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांचा देखील खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'करिअरच्या सुरूवातीला मला अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. मला अनेकदा नकारांना सामोरे जावे लागले, पण मी माघार घेतली नाही...'

राधिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘मेरी आशिकी तुमसे ही’ मालिकेच्या माध्यमातून अभिनयास सुरूवात केली. त्यानंतर राधिकाने ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेतून अभिनयास सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘फटाखा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिवंगत अभिनेता इरफान यांच्यासोबत राधिका ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमातही मुख्य भूमिकेत दिसली.