Rhea Chakraborty ला 'चेहरे' मधून काढण्यामागचं निर्मात्याने सांगितलं कारण?

अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी सिनेमात प्रमुख भूमिकेत 

Updated: Mar 18, 2021, 09:36 AM IST
Rhea Chakraborty ला 'चेहरे' मधून काढण्यामागचं निर्मात्याने सांगितलं कारण?

 मुंबई : अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इमरान हाशमी (Imran Hashmi) हे लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. नुकताच 'चेहरे' (Chehre) या सिनेमाचं टीझर रिलीज झालं आहे. टीझर रिलीज होताच निर्मात्याच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरमधून रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) गायब करण्यात आलं आहे. याबाबत निर्मात्याने दिलं स्मार्ट उत्तर... 

निर्माता आनंद पंडित यांनी दिलं स्मार्ट उत्तर 

रूमी जाफरी यांच्या दिग्दर्शनाखाली 'चेहरे' सिनेमात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)ला कास्ट केलं होतं. मात्र या पोस्टर आणि टीझरमधून रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraboty काढून टाकलं आहे. यानंतर अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. 

निर्माता आनंद पंडित यांनी मिड डे मॅग्झिनने प्रश्न विचारण्यात आले आहेत. यावर त्यांनी उत्तर अतिशय सफाईदार उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की,'या विषयावर मला काहीच भाष्य करायचं नाही. योग्य वेळ आल्यावर मी रिया चक्रवर्तीशी संबंधित प्रकरणावर बोलणार आहे.'

Rhea Chakraborty ला मिळाला सपोर्ट 

रिया चक्रवर्तीला "चेहरे' सिनेमातून साईड लाईन केल्यामुळे अनेक निर्माते तिच्या सपोर्टसाठी उभे राहिले आहेत. अनेक निर्मात्यांनी रियासोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. रिया चक्रवर्ती उत्कृष्ठ अभिनेत्री आहे. चाहते तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. रियाच्या सपोर्टमध्ये एका निर्मात्याने म्हटलंय की,'जर संजय दत्त बेलच्या दरम्यान काम करू शकतो तर रिया का नाही?'

2020 मध्ये सिनेमा होणार होता रिलीज 

अमिताभ बच्चन आणि इमराश हाशमी यांचा 'चेहरे' हा सिनेमा मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा आहे. हा सिनेमा प्रदर्शनाच्या सुरूवातीपासूनच चर्चेत राहिलेला आहे.