'या' कारणामुळे सलमान खान अद्याप अविवाहीत, जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

सलमानच्या लग्नावर भाष्य केले आहे.

Updated: Nov 28, 2021, 05:54 PM IST
'या' कारणामुळे सलमान खान अद्याप अविवाहीत, जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड कलाकार सलमान खानच्या चित्रपटांची  चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचवेळी भाईजानच्या चित्रपटांव्यतिरिक्त चाहतेही त्याच्या लग्नाची ही अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. दरम्यान, 'अंतिम: द फायनल ट्रुथ' अभिनेता आयुष शर्माने सलमानच्या लग्नावर भाष्य केले आहे.

सलमानच्या लग्नावर आयुष शर्माचं वक्तव्य

आयुष शर्माचे लग्न सलमान खानची बहीण अर्पिता खानशी झाले असून दोघांना दोन मुले आहेत. अलीकडेच आयुषने एका संभाषणात सलमानच्या लग्नाबद्दल सांगितले.

आयुष म्हणाला, 'मी सलमानशी त्याच्या लग्नाच्या मुद्द्यावर बोलत नाही. मी त्याला ज्या पद्धतीने पाहतो, तो ज्या पद्धतीने काम करतो, मला वाटत नाही की त्याच्याकडे लग्नासाठी वेळ आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानची जीवनशैली साधी 

आयुष पुढे म्हणाला, 'मला वाटते की तो कोण आहे तो खूप आनंदी आहे. तो स्वतःचे निर्णय घेतो.सलमानच्या जीवनशैलीवर बोलताना आयुष पुढे म्हणाला, 'मी त्याच्यासारखा साधा अजिबात नाही.

Salman Khan reveals how sister Arpita introduced Aayush Sharma to the  family: 'I said I will make the film for free with him' | Entertainment  News,The Indian Express

सलमानसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे घर. त्यांची राहणी आणि राहण्याची पद्धत अतिशय साधी आहे. तो अजूनही तीन वर्षे जुना फोन वापरतो.