मलायकाचं शॉर्ट कपडे घालण्यावर अरबाज खानचा विरोध? घटस्फोटाचं हेच तर कारण नाही ना...

नवरा अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतचे आपला वेळ घालवते.

Updated: Nov 28, 2021, 06:01 PM IST
मलायकाचं शॉर्ट कपडे घालण्यावर अरबाज खानचा विरोध? घटस्फोटाचं हेच तर कारण नाही ना...

मुंबई : मलायका अरोरा सध्या तिच्याच जगात खूप आनंदी आहे. नवरा अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतचे आपला वेळ घालवते. ती त्याच्यासोबतचे रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते, पण एक काळ असा होता जेव्हा ती खान कुटुंबाची सून होती आणि अनेकांच्या मनात त्याबद्दलचे अनेक प्रश्न आहेत. ज्याबाबतची काही उत्तरे अजुनही अनुत्तरीतच आहेत.

त्यातला एक प्रश्न असा की, मलाईका नेहमीच तिचे कपडे आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. परंतु तिचे असे कपडे घालनं, विशेषता छोटे कपडे घालनं अरबाज आवडत असावं का?

अरबाज मलायका द पॉवर कपल

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा विवाह 1998 मध्ये झाला होता. पण 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अरबाज-मलायकाच्या घटस्फोटाची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण यापूर्वी याबाबत चर्चा देखील सुरू नव्हती. दोघेही अनेक बी-टाऊन पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. दोघांचे बाँडिंग असे होते की त्यांना बॉलिवूडचे पॉवर कपल म्हटले गेले.

दरम्यान, या दोघांची साजिद खानसोबतची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा एक कपल वेगळे झाले नव्हते.

अरबाजला मलायकाचे छोटे कपडे घालणे पसंत होते?

व्हायरल होत असलेल्या मुलाखतीत अरबाज खानला मलायका अरोराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. साजिदने प्रश्न विचारला की, 'अनेक लोक असे प्रश्न विचारतात की, मलायका इतकी स्टायलिश आहे आणि इतके छोटे कपडे घालते तर अरबाजला वाईट वाटत नाही का?' अरबाजने उत्तर दिले होते की, "माझी यावर अजिबात हरकत नाही, कारण मलायकाला माहित आहे की तिला काय करायचे आहे आणि काय नाही."

त्यावर मलायका अरोरा म्हणते, "मला पहिली गोष्ट कळते की, आमच्या मर्यादा काय आहेत? मला कामुकता आणि अश्लीलता यातील फरक माहित आहे. हेच कारण आहे की, मी ही रेषा कधीच ओलांडली नाही. मी अशी मॉडेल किंवा अभिनेत्री आहे जिला या सर्व गोष्टींची माहिती आहे. मी काही मूर्ख नाही. मी कधीच लोकांना आमच्याकडे बोट दाखवण्याची संधी देत नाही. आम्ही अशा व्यवसायात आहोत की, आम्ही सर्वांचे समाधान करू शकत नाही."