शाहरूख, सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री आज काय करतेय?

बॉलिवूडमध्ये अचानक झाली गायब 

Updated: Dec 9, 2019, 10:28 AM IST
शाहरूख, सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री आज काय करतेय? title=

मुंबई : बॉलिवूडच्या खानसोबत काम केलेली अभिनेत्री आज मोठ्या पडद्यापासून दूर आहे. बॉलिवूडकडून तिला इतकी उदासिनता मिळाली की तिने ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. 'सिर्फ तुम' या सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आज बॉलिवूडपासून दूर आहे. 

प्रिया गिल असं या अभिनेत्रीचं नाव असून 'सिर्फ तुम' सिनेमात अभिनेता संजय कपूरसोबत काम केलं होतं. आज प्रिया गिल यांचा वाढदिवस आहे. 1995 मध्ये मिस इंडियाची फायनलिस्ट असलेल्या प्रियाने अभिनेता चंद्रचूड सिंहसोबत 'तेरे मेरे सपने'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

4 वर्षांनंतर संजय कपूरच्या "सिर्फ तुम' सिनेमांत काम केलं. या सिनेमानंतर प्रियाला भरपूर लोकप्रियता मिळाली. 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण निर्माता आणि दिग्दर्शकांना तिच्या सुंदरतेने भुरळ पाडली. 

प्रिया गिलने सलमान खान, सुष्मिता सेन, संजय कपूर आणि नागार्जूनसोबत काम केलं आहे. 19 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'जोश' सिनेमात प्रिया, शाहरूखची हिरोईन होती. महत्वाचं म्हणजे या सिनेमात ऐश्वर्याला शाहरूखची बहिणीचं भूमिका साकारली होती. 

'बडे दिलवाला' या सिनेमानंतर प्रियाचं करिअर कुठेतरी ठप्प झालं. ती फक्त सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करू लागली. शेवटची LOC हा सिनेमात दिसली. मुंबईत काही काम नाही झालं तर ती रिजनल सिनेमाकडे वळली. तिने मल्याळम सिनेमात 'मेघम', पंजाबी सिनेमा देखील दिसली. एवढंच नव्हे तर तिने भोजपुरी सिनेमातही काम केलं आहे. 

खेदाची बाब ही आहे की, बॉलिवूड देखील या अभिनेत्रीला विसरला आहे. फक्त सिनेमातूनच नाही तर सोशल मीडियातूनही प्रिया गिल गायब झाली. ती आता कुठे आहे याची माहिती नाही. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x