अभिनेत्री परिणीती चोप्रा करणार एक्टिंगमधून एक्झिट? घेणार राजकारणात प्रवेश

अभिनेत्री परिणीती चोप्राने काहि दिवसांपुर्वी राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचा  उदयपूरला लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या हळदी आणि मेहंदी सेरेमनी तसंच लग्नाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. 

Updated: Dec 10, 2023, 08:50 PM IST
अभिनेत्री परिणीती चोप्रा करणार एक्टिंगमधून एक्झिट? घेणार राजकारणात प्रवेश title=

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने काहि दिवसांपुर्वी राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचा  उदयपूरला लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या हळदी आणि मेहंदी सेरेमनी तसंच लग्नाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या या शाही लग्नसोहळ्यात त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्र परिवाराने हजेरी लावली होती. लग्नानंतर परिणीतीचा 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत बचाव' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता जो  बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. 
 
ती येत्या काही दिवसांत राजकारणातही येऊ शकते. अशा अनेक चर्चा गेले काही दिवस सुरु आहेत. लग्नानंतर परिणीती चोप्राच्या फिल्मी करिअरवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले  आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की आता लग्नानंतर परिणीती तिच्या फिल्मी करिअरमधून एक्झिट घेणार आहे. मात्र या सगळ्यावर आता परिणीतीने आपलं मौन सोडलं आहे. 
 
तिला नुकतंच एका कार्यक्रमात परिणीतीला विचारण्यात आलं की, तिला राजकारणात रस आहे का? यावर ती हसत हसत म्हणाली, ''मी तुम्हाला यशस्वी लग्नाचं रहस्य सांगेन! मी अभिनेत्री आहे, तो राजकारणी आहे. त्याला बॉलीवूडबद्दल काहीच माहिती नाही आणि मला राजकारणातलं काही कळत नाही. त्यामुळेच आमचं लग्न खूप छान चाललंय."

परिणीतीला नाही राजकारणात इन्ट्रेस
तिला विचारण्यात आलेल्या प्रश्वार तिने अगदी हलक्या आणि स्पष्टपणे उत्तल दिलं. तिने दिलेल्या उत्तरावरुन तिला राजकारणात अजिबात रस नाही. त्यामुळे तिझ्या राजकारणातल्या बातम्यांना पुर्णविराम लागला आहे.  तिला अभिनयाच्या दुनियेत कायम राहायचं आहे. परिणिती पुढे म्हणाली, '' प्रोफेशनल जीवनात योग्य संतुलन राखणं खूप महत्त्वाचं आहे. भारतात, कामात व्यस्त असल्यामुळे ती वेळेवर कधी आणि कशी जेवत नाहीत किंवा झोपत नाहीत याबद्दल अभिमानाने बोलताना आपण अनेकदा पाहतो''

परिणिती चोप्रा पुढे म्हणाली, ''मला खरोखर कठोर परिश्रम करण्यावर विश्वास आहे पण मला माझ्या मित्रांना भेटणे आणि सुट्टीवर जाणे देखील तेवढंच आवडतं. जेव्हा मी 85 किंवा 90 वर्षांची असेन आणि मागे वळून पाहिन तेव्हा मला आनंद व्हायला हवा की, मी मला हवं तंस जीवन जगले. लग्नाआधी परिणीतीने दिलजीत दोसांझसोबत इम्तियाज अलीच्या 'चमकिला' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं.