लिव्हर सडण्याला 'या' 5 सवयी कारणीभूत, मद्य आणि तेलकट पदार्थांचा देखील समावेश

लिव्हर आपल्या शरीरातील विविध भागांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. म्हणून या अवयवाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या अशा काही वाईट सवयी आहेत ज्यांचा आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

Updated: Dec 22, 2024, 11:16 AM IST
लिव्हर सडण्याला 'या' 5 सवयी कारणीभूत, मद्य आणि तेलकट पदार्थांचा देखील समावेश title=

Bad Habits That Can Affect Liver: लिव्हर आपल्या शरीरातील प्रमुख भाग आहे. हा भाग आपल्या शरीरातील बऱ्याचशा गोष्टींना नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच या अवयवाची आपण काळजी घेतली पाहिजे. लिव्हरला ज्या गोष्टींमुळे हानी पोहचू शकते त्या गोष्टी करणं आपण टाळलं पाहिजे. मद्य आणि तळलेले पदार्थ लिव्हरला धोकादायक ठरतात. यांच्या सेवनामुळे शरीरातील या अवयवाचं स्वास्थ्य बिघडू शकते. परंतु या नुकसान पोहचवणाऱ्या पदार्थांव्यतिरीक्त अशा काही सवयी आहेत ज्या लिव्हरसाठी धोकादायक मानल्या जातात. या सवयींबद्दल जाणून घेऊया.

'या' तीन सवयी बदला

  • दिवसा झोपण्याची सवय

काही लोकांना दिवसा झोपण्याची सवय असते. बरेचसे लोक दुपारच्या जेवणानंतर अधिक वेळ गाढ झोप घेतात. दुपारी गरजेपेक्षा जास्त झोपण्याची सवय लिव्हरला नुकसान पोहचवू शकते. याऐवजी तुम्ही 10 ते 20 मिनिटांची पावरनॅप घेऊ शकता.

  • रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय

काही लोकांनी रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय असते. तसेच काही लेट नाईट पार्टींना जाणं पसंत करतात. परंतु ही सवय लिव्हरच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरु शकते. यासाठी रात्री लवकर झोपण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा. 

  • खूप राग राग करणे

आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं हे फक्त आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठीच नव्हे तर लिव्हरसाठी सुद्धा फायदेशीर आहे म्हणून तुमचा मूड चांगला आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. 

हे ही वाचा: भारतामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता: उष्णकटीबंधीय देशातही 90% लोक प्रभावित

हे खाद्यपदार्थ ठरु शकतात लिव्हरसाठी घातक

आपण बऱ्याचदा चविष्ट पदार्थ खाणं पसंत करतो. परंतु असे चवीचे पदार्थ आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरु शकतात. हेल्दी लिव्हरसाठी रेड मीट, सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स, मद्य, आणि तेलकट पदार्थांचं सेवन केल्याने लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो. या पदार्थांचं सतत सेवन करणे टाळा आणि सात्विक आहराकडे विशेष लक्ष द्या. 

आरोग्य तज्ञांच्या मते, क्रोनिक आजारापासून दूर राहण्यासाठी लिव्हरच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. जे लोक लिव्हरकडे दुर्लक्ष करतात त्यांना हळू-हळू शरीरात कमजोरी जाणवू शकते. त्यामुळे लिव्हरच्या स्वास्थ्यासाठी ज्या गोष्टी अनुकूल आहेत त्या करण्याकडे लक्ष द्या.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)