'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया

Allu Arjun on CM's Allegations : अल्लू अर्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चेंगराचेंगरीत दुखावत झालेल्या मुलाविषयी आणि मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 22, 2024, 10:54 AM IST
'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया
(Photo Credit : Social Media)

Allu Arjun on CM's Allegations : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन 21 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात त्याचं मत मांडलं आणि तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आरोप देखील फेटाळले. त्यांनी सांगितलं की हैदराबादच्या थिएटरमध्ये चार डिसेंबर रोजी ‘पुष्पा2’च्या प्रीमियर दरम्यान, एका महिलेचं निधन झालं आणि तिच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अल्लू अर्जुननं रोड शो करत असताना थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या दिशेनं हात हलवत त्यांना संबोधित केल्यामुळे रेवंत रेड्डी यांनी टीका केली आहे. त्याच्या काही तासानंतर अल्लू अर्जुननं पत्रकार परिषदेत त्याची प्रतिक्रिया दिली आहे आणि सांगितलं की 'ही कोणती रॅली किंवा रोड शो नव्हता. खूप चूकिची अफवा पसरवली जात आहे की मी एका विशिष्ठ प्रकारे वागलो. हे चुकीचे आरोप आहेत. हे अपमानकारक आहे आणि चरित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. खोटे आरोप करण्यात येत आहेत.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अल्लू अर्जुननं त्या महिलेच्या निधन आणि त्या संपूर्ण घटनेवर सांगितलं की तो कोणला दोष देत नाही कारण ही एक वाईट घटना होती. चार डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षांच्या महिलेचे निधन झाले आणि त्यासोबत तिच्या आठ वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्या मृत महिलेच्या कुटुंबान दाखल केलेल्या तक्रारिच्या आधारावर चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : लग्नानंतर कीर्ति सुरेश इंडस्ट्रीला करणार रामराम? नेमकं काय जाणून घ्या...

अल्लू अर्जुननं हैदराबादच्या पोलिस स्टेशनमध्ये 13 डिसेंबर रोजी महिलेच्या निधनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेलंगाना हायकोर्टानं त्याला अंतरिम जामीन देली आणि 14 डिसेंबर रोजी सकाळी त्याची सुटका झाली. अल्लू अर्जुन या चेंगराचेंगरीत गंभीर दुखापत झालेल्या मुलाविषयी सांगत म्हणाला, 'मला दर तासाला अपडेट मिळते की त्याच्य आरोग्यात नेमके काय बदल होत आहेत. एकमेव चांगली गोष्ट ही आहे की त्या मुलाच्या आरोग्यात चांगले बदल होत आहेत. माझे पूर्ण प्रयत्न आहेत की प्रेक्षकांचे मनोरंजन करू जेणे करून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल.'

About the Author