close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

महिलांना फिरण्यासाठी पुरूषांच्या परवानगीची गरज नाही-दिया मिर्झा

वयाच्या 18 व्या वर्षी तिने तिच्या करियरची सुरूवात केली.

Updated: Mar 13, 2019, 05:35 PM IST
महिलांना फिरण्यासाठी पुरूषांच्या परवानगीची गरज नाही-दिया मिर्झा

मुंबई : पुरूषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात कोणतेही काम करायचे असेल तर घरातल्या पुरूषाची परवानगी घ्यावी लागते. पण आता तसे राहीले नसल्याचे अभिनेत्री दिया मिर्झाचे म्हणने आहे. वयाच्या 18 व्या वर्षी तिने तिच्या करियरची सुरूवात केली. 2000 मध्ये फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेमध्ये तिने स्वत:चे नाव पटकावले. त्यानंतर ती तिच्या मैत्रिंणीसोबत थायलंडला फिरायला गेली होती.

मुलाखतीत दियाला एक प्रश्न विचारण्यात आला. एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रति समाजात तुला कोणते बदलाव अनुभवास आले. त्यावर दियाने उत्तर दिले, 'महिलांना फिरण्यासाठी पुरूषांच्या परवानगी काही गरज नाही. त्यांना स्वत:च्या परवानगीची गरज आहे. माझ्या मते हे सशक्तीकरण आहे.'

पुरूषप्रधान समाजात अशा मानसितेचे लोक आहेत ज्यांच्या मते महिलांना संरक्षणाची गरज आहे आणि महिलांनी एकटे बाहेर जाण्यास विरोध आहे. पण आता समाजात बदल घडत आहेत. आता महिलांना एकट्याने प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते.