'मला बॉलिवूडमधून हाकलून देऊ शकता पण'... अर्जुन कपूरच्या वक्तव्याने खळबळ

गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या कमेंटने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.  

Updated: Jun 7, 2022, 09:40 PM IST
'मला बॉलिवूडमधून हाकलून देऊ शकता पण'... अर्जुन कपूरच्या वक्तव्याने खळबळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या विनोदबुद्धीसाठी ओळखला जातो. अर्जुन अभिनय आणि सोशल मीडियावरील त्याच्या मजेशीर पोस्ट्ससाठी प्रसिद्धी मिळवतो. अलीकडे, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या कमेंटने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.  

खरंतर, अर्जुन कपूरने नुकतीच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो गोविंदाच्या 'किसी डिस्को में जाये' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. ब्लॅक कॅप आणि गॉगल घातलेल्या कॅज्युअल आउटफिटमध्ये अर्जुन सुंदर दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''मलाही तो आवडला, मी तो शूटही केला, मी तो हटवला नाही. तुम्ही मला बॉलीवूडमधून बाहेर काढू शकता, पण बॉलीवूडला माझ्यातून बाहेर काढू शकत नाही.

काही वेळातच अर्जुन कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. अशा परिस्थितीत मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुनच्या पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वतःला कसं रोखू शकते. अभिनेत्याच्या पोस्टला उत्तर देत तिने लिहिलं, "hahaha epic."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्जुन कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याकडे बॅक टू बॅक प्रोजेक्ट आहेत. तो तारा सुतारिया, दिशा पटानी आणि जॉन अब्राहमसोबत 'एक व्हिलन 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर 'डॉग' आणि 'द लेडी किलर'मध्येही त्याची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे.