Youtuber Armaan Malik पुन्हा झाला बाबा, दुसऱ्या पत्नीमागोमाग पहिल्या पत्नीने दिली गूड न्यूज

Armaan Malik Wife Payal Welcome Twins : युट्यूबर अरमान मलिकच्या दुसरी पत्नी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नुकतंच बाळाला जन्मला दिला आहे. आता  अरमान मलिक पुन्हा एकदा बाप झाला आहे. पहिल्या पत्नी पायलने गोड बातमी दिली आहे. 

Updated: Apr 26, 2023, 10:47 PM IST
Youtuber Armaan Malik पुन्हा झाला बाबा, दुसऱ्या पत्नीमागोमाग पहिल्या पत्नीने दिली गूड न्यूज title=
Youtuber Armaan Malik first wife payal malik welcomes twins video on social media google Trending News

Armaan Malik Wife Payal Welcome Twins : दोन पत्नीसोबत राहणारा यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. दोन पत्नी आणि त्या दोघींनी एकत्र गरोदर झाल्या. त्या दोघांची बेबी शॉवर एकत्र साजरा करण्यात आलं. सोशल मीडियावर त्याचा खाजगी आयुष्यातील अनेक व्हिडीओ तो टाकत असतो. सोशल मीडियावर त्याचा एक चाहत्या वर्ग आहे. त्यांनी पु्न्हा आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

पहिल्या पत्नी पायलने दिली गुडन्यूज

काही दिवसांपूर्वी यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) दुसरी पत्नी कृतिका मलिकनं (Kritika Malik)  मुलाला जन्म दिला. आता त्याच्या पहिल्या पत्नीने पायल मलिकने (Payal Malik) जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पायलला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. आता अरमान मलिक दोन पत्नीसह चार मुलांचा बाप झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

त्याने ही गूड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Youtuber Armaan Malik first wife payal malik welcomes twins video on social media google Trending News) अरमान मलिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत ही गूड न्यूज दिली आहे. या फोटोमध्ये कृतिका, अरमान, पायल आणि पायलचा मोठा मुलगा चिरायू दिसत आहेत. 

नवीन पाहुण्यांचं कुटुंबाकडून स्वागत 

अरमान मलिकसह या जुळ्या मुलांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. यावेळी नवीन पाहुण्यांचं स्वागत कुटुंबियांनी गाणं गाऊन केलं. या क्षणाचा व्हिडीओही अरमानने शेअर केला आहे.

तो क्षण आला...

पायलनेही सोशल मीडियावरील त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर करत शेवटी तो क्षण आला...

आई असल्याचा खूप अभिमान वाटतो असं लिहिलं आहे. हॉस्पिटलमधील पायल आणि बेबी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

सोशल मीडियावर अरमान खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी 2011 मध्ये पायलशी लग्न केलं. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिका मलिकशी लग्न केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायलटची दोन्ही गर्भधारणा ही आयव्हीएफद्वारे झाली आहे.