YouTuber Carry Minati Raise Fund For Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर जिल्ह्यामधील शुक्रवारी बाहानगा स्टेशनजवळ एक भीषण ट्रेन अपघाता झाला. या भीषण अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सरकारनं 10 लाख रुपयांनी मदत करणार असल्याचे जाहिर केले आहे. याशिवाय या अपघातात जखमी झालेल्यांना मदतही करणार आहेत. या गंभीर अपघाताला पाहता अनेक लोक त्यांच्या मदतीस धावून आले आहेत. त्यात लोकप्रिय युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अजय नागर उर्फ कॅरी मिनाती देखील आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
काही वर्षात भारतात झालेल्या या सगळ्यात मोठ्या ट्रेन अपघातासाठी कॅरी मिनातीनं ही मदत देऊ केली आहे. कॅरी मिनातीनं काही तासांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. कॅरी मिनातीनं एक पोस्ट शेअर करत आधी खुलासा केला होता की तो ओडीशात झालेल्या ट्रेन अपघातासाठी लाइव्ह स्ट्रीमच्या मदतीनं निधी गोळा करणार आहे. त्यातून गोळा केलेला सगळा निधी हा ओडीशाच्या मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येईल. कॅरी मिनातीनं लाइव्हस्ट्रीमच्या मदतीनं 11 लाख 87 हजार 12 रुपये निधी गोळा केला आहे. याशिवाय कॅरी मिनातीनं 1.5 लाखी रुपये स्वत: च्या खिशातून दान केले आहेत. याविषयी बोलताना कॅरी मिनाती म्हणाला, " ही हृदय पिळवटून टाकणारी दृष्य आहेत. ज्या लोकांवर याचा परिणाम झाला आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहेत. ज्या लोकांना जखमा झाल्या आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या पातळीवर सगळ्यांना मदत करायला हवी. ज्यांनी यासाठी मदत केली त्यांचा मी आभारी आहे."
I would like to express my heartfelt gratitude to everyone who supported the charity stream yesterday. Thanks to your generous contributions, we were able to raise a total of INR 11,87,611.64 by 1 pm today. To further enhance the impact, I have personally added INR 1.5 lacs,… pic.twitter.com/rIKMZDecqv
— Ajey Nagar (@CarryMinati) June 4, 2023
कॅरी मिनातीनं अशा प्रकारे निधी गोळा करण्याची ही पहिली वेळ नाही तर यापूर्वी देखील त्यानं 2020 मध्ये आसाम आणि बिहार या पूरग्रस्त राज्यांसाठी निधी गोळा केला होता. त्यावेळी त्यानं 12 लाख रुपयांचा निधी गोळा केला होता.
दरम्यान, ओडिशा अपघातासाठी मदतीसाठी समोर आलेल्या लोकांमध्ये गौतम अदानी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागही पुढे आले आहेत. त्या दोघांनी मृत्यूच्या मुलांसाठी त्यांच्या शाळेत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे सांगितलं आहे.