close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'विश्वसुंदरी' युक्ता मुखी 10 वर्षे कलाविश्वापासून दूर

युक्ता आज 46 वर्षांची झाली 

Updated: Oct 16, 2019, 02:49 PM IST
'विश्वसुंदरी' युक्ता मुखी 10 वर्षे कलाविश्वापासून दूर

मुंबई : बॉलिवूड एक अशी इंडस्ट्री आहे जिथे एंट्री घेणं जितकं कठीण आहे तितकंच कठीण येथे टिकणं असतं. इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी अनेक टॅलेंटेड लोकं येत असतात. यामधले काही हिट होतात तर काही फ्लॉप होतात. या इंडस्ट्री काही स्टार मात्र असे असतात जे लोकांना पसंत पडतात पण अचानक गायब होतात. 

अशीच एक स्टार आहे 1999 मध्ये विश्वसुंदरीचा किताब मिळवलेली युक्ता मुखी. आज युक्ता मुखीचा 46 वा वाढदिवस आहे. युक्ती मुखी अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. 

युक्ता मुखीला 1999 मध्ये मिस इंडियाचा किताब मिळाला आणि त्याचवर्षी मिस वर्ल्ड देखील झाली. एकाचवर्षी दोन दोन ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये तिची आतुरतेने वाट पाहिली गेली. 2002 मध्ये 'प्यासा' सिनेमातून युक्ताने पदार्पण केलं. या सिनेमात युक्ताने आफताब शिवदासानीसोबत काम केलं. त्यानंतर 2006 मध्ये 'कठपुतली' हा सिनेमा आला. 2008 मध्ये 'मेमसाब' या सिनेमात शेवटची दिसली. यानंतर 10 वर्षे झाली युक्ता गायब झाली आहे. 

बॉलिवूडमध्ये तिची अयशस्वी ठरली याला कारण आहे तिची उंची. युक्ता मुखीची उंची 6.1 अशी आहे. 2008 मध्ये युक्ताने न्यूयॉर्क बेस्ड बिझनेसमन प्रिंस तुलीसोबत लग्न केलं. या दोघांच अतिशय ग्रँड लग्न आणि रिसेप्शन झालं. ज्याची खूप चर्चा झाली. या दोघांना एक मुलगा आहे. 2013 मध्ये युक्ता मुखीसंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली. युक्ताने आपला नवरा प्रिंस तुलीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पतीने मारहाण केल्याचा आरोप युक्ताने केला होता. 

2014 जून मध्ये युक्ता आणि प्रिंस यांनी घटस्फोट घेतला. मुलाचा ताबा युक्ताकडे असून युक्ता अजूनही लाइम लाइटपासून दूर आहे. आताही कोणत्याही सिनेमात दिसली नाही. कोणत्याही बॉलिवूडशी संबंधीत गोष्टीतही ती दिसलेली नाही.