close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Youtube वर या मुलीचा धमाकेदार व्हिडिओ

पाहा हा धमाकेदार व्हिडिओ

Updated: Oct 15, 2019, 11:03 AM IST
Youtube वर या मुलीचा धमाकेदार व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन, तब्बू आणि रकुल प्रीत सिंह यांचा कॉमेडी सिनेमा 'दे दे प्यार दे' मधील गाणं लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या सिनेमाच्या 'हाउली हाउली' गाण्यावर रकुल प्रीत सिंहने जबरदस्त डान्स केला आहे. रकुलच्या या सुंदरतेवर सिनेमामध्ये अजय देवगन भाळला आहे. या गाण्यात तब्बूचा डान्स देखील पसंत पडला. सोशल मीडिया या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याच गाण्यावर एका तरूणीने अगदी क्रेझी होऊन डान्स केला आहे. 

लोकप्रिय होतोय हा व्हिडिओ 

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्याच्याशी सगळेच जोडण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून देशातील टॅलेंट जगासमोर येत आहे. या प्लॅटफॉर्ममधून प्रत्येकजण आपली कलाकृती सादर करत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. Amruta Phadnis नावाची एक मुलगी यू-ट्यूबमुळे लोकप्रिय झाली आहे. तिने एक व्हिडिओ अपलोड केलं आहे. आणि लोकांना तो व्हिडिओ इतका आवडला आहे की त्याला खूप पसंती मिळत आहे. 

या व्हिडिओत मुलीने जबरदस्त डान्स केला आहे. 27 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. 4 लाखहून अधिक हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. या व्हिडिओत डान्स करणारी मुलगी इतर गाण्यांवर देखील डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.