फिल्मी कीरकीर्द फ्लॉप, तरीही जगतो लक्झरी लाइफ; 'या' अभिनेत्याची एकूण संपत्ती जाणून व्हाल अवाक्

Zayed Khan Net Worth: या फोटोमधील चिमुकला आपल्या भावासोबत दिसतोय. हा चिमुकल्याने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले तरीही त्याची कारकीर्द फ्लॉप ठरली. पण तो आज जगतोय लक्झरी लाइफस्टाइल. 

नेहा चौधरी | Updated: Jul 5, 2024, 09:53 AM IST
फिल्मी कीरकीर्द फ्लॉप, तरीही जगतो लक्झरी लाइफ; 'या' अभिनेत्याची एकूण संपत्ती जाणून व्हाल अवाक् title=
Zayed khan net worth birthday special unknown facts

Zayed Khan Net Worth: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सुष्मिता सेनसोबत (Sushmita Sen) मोठ्या परद्यावर झळकलेला हा चिमुकला प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांचा मुलगा आहे ज़ायेद खान. आज त्याचा 44 वा वाढदिवस असून तो फिल्मी दुनियापासून कोसो दूर आहे. काही हिट चित्रपटात काम करुनही त्याच फिल्म करिअर फार चांगल नव्हतं. तरी तो आज लक्झरी आयुष्य कसं जगतोय असा प्रश्न चाहत्यांना पडतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZAYED KHAN (@itszayedkhan)

मुंबईत 5 जुलै 1980 मध्ये जायेदचा जन्म झाले तेव्हा त्याचे वडील अभिनेता, दिर्ग्दश आणि निर्माते होते. जायेदला सुझैन खानसह तीन बहिणी आहेत. फिरोज खान हे जायेदचे मोठे काका आणि फरदीन खान हा चुलत भाऊ आहे. 
तर जायेदने ईशा देओलची बालपणीची मैत्रीण मलायका पारेखशी 2005 मध्ये लग्न केलं. त्याला दोन मुलं आहे. जायेदने एमबीएचं शिक्षण घेतलं असून लंडन फिल्म अकादमीमधून त्याने फिल्म मेकिंगचं धडे गिरवले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZAYED KHAN (@itszayedkhan)

2003 मधील चुरा लिया है तुमने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घतेली. त्यानंतर 2005 मध्ये मैं हूं ना या चित्रपटातून त्याला खास ओळख मिळाली. शाहरुख खान, सुष्मिता सेन आणि अमृता राव यांच्यासोबत त्याने स्क्रीन शेअर केली होती. 'दस', 'वादा', 'युवराज', 'शब्द', 'फाईट क्लब', 'रॉकी', 'तेज', 'अंजाना अंजानी' हे बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटामुळे त्याने बॉलिवूडला राम राम ठोकलं. 

त्यानंतर त्यांने फ्री एंटरटेनमेंटची निर्मिती कंपनीमध्ये आपलं भाग्य आजमावयाचं ठरवलं. या कंपनीच्या माध्यमातून त्याने दिया मिर्झासोबत लव्ह ब्रेकअप जिंदगी बनवला. तोही फार जादू करु शकला नाही. मग ही कंपनी दुसऱ्या कंपनीच्या सहकार्याने पैसे गुंतवून सुरु आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZAYED KHAN (@itszayedkhan)

मीडिया रिपोर्ट्सनुसार जायेद खान लक्झरी आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. शिवाय त्याचा स्वत:चा व्यवसायही आहे. त्याची एकूण संपत्ती ही 15 अब्ज रुपये म्हणजे अंदाजे 1500 कोटींच्या घरात आहे. खरं तर त्याच्या संपत्तीचा आकडा हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे.