मुंबई : 'झी मराठी अवॉर्ड्स 2020-21' पूर्वार्ध मध्ये 'माझा होशील ना', 'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'देवमाणूस' या मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. ब्रह्मे मामांनी सर्वोत्कृष्ट भावंडं आणि सासरे अशा दोन पुरस्कारांवर नावं कोरली. तर देवमाणूस मालिकेतील सरु आजी आणि टोण्या या आजी-नातवंडाच्या जोडीने सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा विभागात पुरस्कार पटकावले.
माझा होशील ना ला 04, येऊ कशी तशी मी नांदायला ला 04, देवमाणूस ला 03, अग्गंबाई सासूबाई ला 02 पुरस्कार मिळाले, त्यामुळे या मालिकांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. आता येत्या रविवारी म्हणजेच ४ एप्रिल ला 'झी मराठी अवॉर्ड्स 2020-21'चा उत्तरार्ध रंगणार आहे. सर्वोत्कृष्ट स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, कथाबाह्य कार्यक्रम, सूत्रसंचालक, नायक, नायिका, जोडी, कुटुंब, मालिका यासारखे पुरस्कार जाहीर होणार आहेत त्यामुळे मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळणार हे नक्की.
सोबतच या सोहोळ्यात ‘सारेगमप’ चे पंचरत्न रसिक प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत, आणखी बरेच सुखद आश्चर्याचे धक्के या सोहोळ्यात प्रेक्षकांना मिळणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका झी मराठी अवॉर्डचा २०२०-२१ चा उत्तरार्ध रविवार ४ एप्रिल संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.