झी मराठीची नवी मालिका 'लाडाची मी लेक गं' प्रेक्षकांच्या भेटीला

कस्तुरी आणि सौरभची प्रेमकथा

Updated: Sep 1, 2020, 12:09 PM IST
झी मराठीची नवी मालिका 'लाडाची मी लेक गं' प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : लग्नाआधी आई वडिलांची लाडाची लेक लग्न झालयावर सासरची सून होते. पण लाडाची लेक राहत नाही. माहेरचे दरवाजे आजकाल लग्नानंतरही उघडे असतात पण मुलगी मात्र परक्याचा धन म्हणतात. आजवर हे असच घडत आलंय. पण बापाची लाडाची लेक आणि मुलीवर जीवापाड प्रेम करणारा बाप लग्नानंतरही सावली सारखा आणि देवासारखा उभा राहिला तर...? ही गोष्ट आहे अशाच लाडक्या कस्तुरीची.

या मालिकेत आपल्याला कस्तुरीचा प्रेमसंघर्ष पाहयला मिळणार आहे. या मालिकेत प्रेमात संघर्ष नाही तर प्रेम आणि संघर्ष दोन्ही आहे. या मालिकेत मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता तांबे आणि उमेश जगताप हे कलाकार असणार आहेत. कस्तुरी आणि सौरभची प्रेमकथा १४ सप्टेंबर पासून संध्याकाळी ७ वा. फक्त झी मराठीवर पाहता येणार आहे.