झी युवा दांडिया : आपल्या आवडत्या 'युवा' कलाकारांसह खेळा गरबा

युवा कलाकारासोबत खेळा गरबा 

Updated: Oct 5, 2019, 01:17 PM IST
झी युवा दांडिया : आपल्या आवडत्या 'युवा' कलाकारांसह खेळा गरबा title=

मुंबई : 'झी युवा', ही दर्जेदार मराठी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी मराठी वाहिनी आहे. मनोरंजनाचा मोठा खजिना असलेल्या या वाहिनीसह, तरुणांचे पायही आता थिरकणार आहेत. निमित्त आहे ते ठाण्यात रंगणार असलेल्या 'झी युवा दांडिया २०१९'चे!! श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या दांडियात 'झी युवा'चा सुद्धा सहभाग असणार आहे.

झी युवाच्या चाहत्यांना, त्यांच्या लाडक्या कलाकारांसोबत गरबा खेळण्याची सुवर्णसंधी, या 'दांडिया नाईटमधून मिळणार आहे. 'झी युवा'वरील तुमच्या लाडक्या मालिकांमधील, तितिक्षा तावडे, सिद्धार्थ बोडके, अभिजित श्वेतचंद्र, पूजा बिरारी, हृता दुर्गुळे, यशोमन आपटे, निखिल दामले, गौरी कुलकर्णी, करण बेंद्रे, शरयू सोनवणे हे कलाकार यात सहभागी होतील. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत गरब्याच# आनंद घेण्यासाठी तुम्हीदेखील सज्ज व्हा. 

सोमवार ७ ऑक्टोबर, २०१९ रोजी या सोहळ्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान, भागवती शाळेचे मैदान, विष्णू नगर, नौपाडा, ठाणे येथे संध्याकाळी ६ पासून रात्री ९ वाजेपर्यंत 'युवा' कलाकारांची उपस्थिती दांडियामध्ये असणार आहे. हा जबरदस्त माहोल अनुभवण्यासाठी आणि आवडत्या कलाकारांसह गरबा खेळण्यासाठी, नक्की सहभागी व्हा, 'श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान आयोजित ' झी युवा दांडिया २०१९' मध्ये!!!