लावणीची महती साता-समुद्रा पलीकडे

कोलंबियातून आल्या या स्पर्धक 

लावणीची महती साता-समुद्रा पलीकडे title=

मुंबई : महाराष्ट्राची लावणीची परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा वाहिनीने 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रमनुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध लोकनृत्य 'लावणी'ला मंच उपलब्ध करून देणाऱ्या अप्सरा आली या कार्यक्रमातबुधवार ते शुक्रवार प्रेक्षक महाराष्ट्रातील लावण्यवतींची अदाकारी अनुभवू शकतील.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १४ अप्सरांपैकी १ महाअप्सरा निवडण्याची जबाबदारी देखील तितक्याच जबाबदार हातांना सोपवण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी,लावण्यवती सुरेखा पुणेकर आणि अभिनेत्री दीपाली सय्यद या तीन महारथी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणार आहेत, तर सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सांभाळणार आहे.या कार्यक्रमात फक्त महाराष्ट्रच नव्हे तर चक्क परदेशातूनदेखील लावण्यवतींनी सहभाग घेतला आहे.  

२२ वर्षीय क्लॉडिया आणि लीटा या कोलंबियाच्या रहिवासी आहेत. लावणी हा नृत्यप्रकार शिकण्यासाठी त्या दोघीही अनेक अडचणींचा सामना करून भारतात आल्या आणि त्यांनी या नृत्याचं प्रशिक्षणघेतलं. हाती पुरेसे पैसे नसताना देखील त्यांनी खडतर प्रवास करत भारत गाठला आणि हा नृत्यप्रकार फक्त आत्मसातच नाही केला तर कोलंबियामध्ये जाऊन हा नृत्यप्रकार दुसऱ्यांना शिकवण्यासाठी'अंजली' नावाचं इन्स्टिट्यूट देखील चालू केलं.

भाषा आणि दोन देशांमधील अंतर याचा अडथळा पार करत क्लॉडिया आणि लीटा अप्सरा आली या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. लावणीप्रती त्यांच्यामनात असलेल्या प्रेम आणि जिद्दीला सलाम. अशाच लावण्यवतींमुळे लावणीची महती सातासमुद्रा पलीकडे परसरली आहे असं म्हणणं खोटं ठरणार नाही.

तेव्हा क्लॉडिया आणि लीटा यांची बहारदार लावणी पाहण्यासाठी बघायला विसरू नका 'अप्सरा आली' बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवावर!!