मुंबई : झी युवावरील लोकप्रिय मालिका गुलमोहरमधील हृदयस्पर्शी कथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. सध्या गुलमोहर मालिकेच्या काही भागात 'बोक्या सातबंडे' या९०च्या दशकातील मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेच्या मनोरंजक कथा सादर केल्या जाणार आहेत. आगामी कथेत बोक्या हा त्याच्या समोरच्या घरात राहणाऱ्या बेलवंडी आजी आजोबांच्या चाऱ्यावर हसू उमटवणार आहे.
बोक्याच्या सोसायटीत बेलवंडी आजी आजोबा राहतात. एकदा काही कारणाने बोक्या त्यांच्या घरी गेला. तेव्हा त्याला थोडीशी उदासीनता जाणवली. आजी आजोबा आपल्या आपल्यातच राहत. काही न काही कारणाने बोक्याचं त्याघरात जाणं वाढू लागलं. हळूहळू बोक्या आणि त्यांच्यात मैत्री होऊ लागली. बोक्याला हे सुद्धा समजलं की त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे. त्यांना एक नातू सुद्धा आहे. आजी आजोबा त्याची वाट बघत आहेत. पण तोकाही केल्या इथे येत नाही आहेत आणि अशातच एक दिवस आजोबांच्या मुलाचं त्यांना पत्र येतं.
आणि बोक्याच त्यांना ते वाचून दाखवायला सुरु करतो. पण पूर्ण वाचत नाही. कारण त्यात असं लिहिलंय की तो मुलगा आणि नातूकधीही इथे येणार नाहीत. हे कळल तर आजी आजोबांना खूप वाईट वाटेल. म्हणून बोक्या गप्प राहतो. तो आजी आजोबांना सांगतो की तुमचा नातू तुम्हाला भेटायला येणार आहे. आजी आजोबा खूप खूष होतात. आणि त्यानंतरबोक्या हा आपल्या दादाला त्यांचा नातू बनायला सांगतो. दादा कसाबसा तयार होतो. आणि आजी आजोबांच्या घरी जातो. दोघंही खूष होतात. आणि हयाच दरम्यान बोक्याचे बाबा काही कामानिमित्त बेलवंडी आजी आजोबांच्या घरीजातात. आजी आजोबा त्यांना आपल्या नातवाविषयी सांगतात. दादाची कोंडी होते आणि तो आतल्या खोलीत लपून बसतो. बोक्याची ही खोडी पकडली जाईल का? बोक्याचा भाऊ हा त्यांचा खरा नातू नाही आहे हे कळल्यावर आजी आजोबांना कसं वाटेल? हे जाणून घेण्यासाठी पहायला विसरु नका गुलमोहर प्रत्येक सोमवार आणिमंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर!