मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी '10' नैसर्गिक गोष्टी

पौष्टिक आणि नैसर्गिक पदार्थांच करा सेवन

Updated: Nov 27, 2019, 10:00 AM IST
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी '10' नैसर्गिक गोष्टी title=

मुंबई : मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक महिला 15 ते 50 या वयात प्रत्येक महिन्यात या मासिक पाळीच्या दिवसातून जात असते. मासिक पाळीच्या या सायकलमध्ये प्रत्येक महिला वेगवेगळ्या समस्यांमधून जात असते. अनेकदा महिलांना काही सणांनिमित्त किंवा एखाद्या कार्यक्रमानिमित्त मासिक पाळी उशिरा कशी येईल याच्या प्रयत्नात असतात. याकरता बाजारात अनेक औषध उपलब्ध आहेत, पण या औषधांचा शरीरावर दुष्परिणाम होतो. पण अनेकदा महिला या गोळ्यांचे सेवन करतात. गोळ्यांच सेवन करणाऱ्या अशा सगळ्या महिलांसाठी हे 10 नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ ज्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली जाऊ शकते. घरगुती उपाय म्हणून या 10 पदार्थांकडे पाहिलं जाऊ शकतं. 

सफरचंदाचे विनेगर 

सफरचंदाचा रस अनेक दिवस साठवून ठेवून त्याचं विनेगर तयार केलं जातं. हे एक चमचा विनेगर ग्लासभर पाण्यात मिसळून प्यावे. महत्वाचं म्हणजे हे पाणी झोपण्यापूर्वी प्यावे. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. 

चणा आणि मसूर डाळीचा सूप 

एक कप चणा आणि मसूरच्या डाळ वाटून घ्यावी. हे मिश्रण एक चमचा घेऊन ग्लासभर कोमट पाण्यात मिसळा. या मिश्रणाचं सूप तयार करून मासिक पाळीच्या एक आठवडा अगोदर प्या. 

रसबेरी 

रसबेरी हे फळ वर्षातून एकदाच उन्हाळ्यात मिळते. पण त्याची पाने देखील फायदेशीर असतात. रसबेरीच्या पानांचा चहा बनवून त्याच सेवन केल्यास फायदा होतो. ही चहा मासिक पाळीच्या एक आठवडा अगोदर प्यावे. 

पार्सली 

पार्सलीची पाने घेऊन अर्धा लिटर पाण्यात 20 मिनिटे उकळवावे. त्यानंतर हे पेय ग्लासात घेऊन एक चमचा मध घालावे. हे पेय मासिक पाळीच्या चार दिवस अगोदर दिवसातून दोनदा प्यावे याने मासिक पाळी पुढे जाण्यास मदत होईल. 

मोहरी 

कोमट दुधात 2 चमचे मोहरी पावडर घालावी. हे पेय चांगले हलवून मासिक पाळीच्या 5 ते 6 दिवस अगोदर प्यावे. याने मासिक पाळी पुढे जाईल. 

लिंबू सरबत 

2 चमचे लिंबू सरबत कोमट पाण्यात करावे. यामुळे मासिक पाळी पुढे सरकेल. 

जिलेटीन 

जिलेटीनच्या एक पॅकेट ग्लासभर कोमट पाण्यात पूर्ण मिसळावे. 5 मिनिटे मिश्रण हलवून ते प्यावे. दिवसातून तीन वेळा दररोज प्यावे जोपर्यंत मासिक पाळी पुढे ढकलायची आहे. 

फरसबी 

कपभर फरसबी 100 मिली पाण्यात 3 ते 4 वेळा उकळून घ्यावे. त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालावा. मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर हे मिश्रण प्यावं. मासिक पाळी पुढे जाण्यास मदत होईल. 

दालचिनी 

कपभर पाण्यात दालचिनी टाकून उकळा. 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर उकळल्यावर हे पाणी मासिक पाळीच्या एक आठवडा अगोदर प्या.