Champions Trophy: "ICC देतंय लॉलीपॉप...", PCB च्या 'या' निर्णयावर पाकिस्तानच्या बासित अली चिडला, बघा Video

2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 T20 विश्वचषक यांच्याशी संबंधित होस्टिंग अधिकार आणि आर्थिक नुकसानभरपाई संदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बासित यांचे विधान आले आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 15, 2024, 08:29 AM IST
Champions Trophy: "ICC देतंय लॉलीपॉप...", PCB च्या 'या' निर्णयावर पाकिस्तानच्या बासित अली चिडला, बघा Video  title=

Basit Ali Statement on Champions Trophy: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली (Basit Ali) गेल्या काही काळापासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत आपले मत मांडत आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डला (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सोबतचा कथित करार स्वीकारण्याच्या शक्यतेवर चिंता व्यक्त केली आहे. बासित अलीने या कराराला 'लॉलीपॉप' म्हंटले आहे. पीसीबीने हा करार मान्य करू नये, कारण त्यामुळे पाकिस्तानचे नुकसान होईल, असे बासित अलीचे म्हणणे आहे. 2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 T20 विश्वचषक यांच्याशी संबंधित होस्टिंग अधिकार आणि आर्थिक नुकसानभरपाई संदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बासित यांचे विधान आले आहे. 

हायब्रीड मॉडेलवर पीसीबी झाले सहमत

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणिपाकिस्तान क्रिकेट बोर्डने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलवर सहमती दर्शवली आहे, ज्यामुळे भारताला त्यांचे सामने पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये खेळवण्यात येतील. राजकीय तणावामुळे चाललेल्या या निर्णयामुळे पीसीबीच्या महसुलाच्या तोट्याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. याचे कारण असे की कमाईचा प्रमुख स्रोत असलेला भारत-पाकिस्तान सामना पाकिस्तानमध्ये होणार नाही. करारानुसार, पाकिस्तान 2026 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील लीग-स्टेज सामन्यांसाठी भारतात जाणार नाही. त्याऐवजी हा सामना कोलंबो (श्रीलंका) येथे खेळवला जाईल. भारत आणि श्रीलंका 2026 च्या T20 विश्वचषकाचे संयुक्त यजमान आहेत. त्या बदल्यात, ICC ने 2027 नंतर महिला विश्वचषकासाठी पाकिस्तानला यजमानपद देण्याचे आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा: "आधीच बहिष्कार घाला..." चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा वातावरण तापले, रशीद लतीफचा PCB ला सल्ला

 

बासित अलीने केली टीका 

बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडीओमध्ये, हा करार स्वीकारल्याबद्दल पीसीबीवर टीका केली की त्याचा पाकिस्तान क्रिकेटला विशेष फायदा होणार नाही. पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी जोर देण्याचे त्यांनी बोर्डाला आवाहन केले आणि हाय-प्रोफाइल पुरुषांच्या स्पर्धेचे आयोजन करण्याच्या आर्थिक आणि क्रिकेटच्या महत्त्वावर जोर दिला.

हे ही वाचा: IND vs PAK: आज होणार भारत-पाकिस्तान सामना! किती वाजता आणि कुठे बघता येणार मॅच? जाणून घ्या

 

आयसीसी देत ​​आहे लॉलीपॉप...

बासित म्हणाले, "आता असे म्हटले जात आहे की 2027 किंवा 2028 मध्ये महिला विश्वचषकचे यजमानपद पाकिस्तानला दिला जाईल. प्रत्येकजण म्हणेल, 'वाह! एक नाही तर दोन आयसीसी इव्हेंट (पाकिस्तानमध्ये) हे खूप छान आहे! पण अशा घटनांचा अर्थ काय? 2026 मध्ये पाकिस्तानचा संघ भारतात यावा आणि त्यानंतर भारतीय महिला संघ पाकिस्तानात यावा यासाठी असे केले जात आहे. प्रसारकांचे कोणतेही नुकसान होणार नाही." 

हे ही वाचा: नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच

पुढे म्हणाला, "लॉलीपॉप म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? हा लॉलीपॉप आहे जो आयसीसी पीसीबीला देत आहे... की तुम्ही याला सहमत असाल तर लेखी काहीही मागू नका आणि आम्ही तुम्हाला आणखी एक आयसीसी कार्यक्रम देऊ. याचा पाकिस्तानला काही फायदा होणार नाही. त्याऐवजी त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कपसाठी बोली लावावी. पीसीबीने याबाबत विचारणा करावी. महिला विश्वचषक किंवा अंडर-19 विश्वचषक आयोजित करून पीसीबीला कोणताही फायदा होणार नाही."