वयाच्या 116व्या वर्षी केला कोरोनाचा सामना, तरुणांना ही लाजवेल अशी कहाणी

शनिवारी तुर्कीहून आलेल्या एका बातमीने सर्वांना समाधान मिळालं आहे. 

Updated: Sep 5, 2021, 07:43 AM IST
वयाच्या 116व्या वर्षी केला कोरोनाचा सामना, तरुणांना ही लाजवेल अशी कहाणी

अंकारा: कोरोनाचा फटका संपूर्ण जगाला बसलेला आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. बहुतांश प्रमाणात वृद्धांना याचा अधिक धोका मानला जातो. ज्यामुळे आजही लोकांमध्ये याची भीती आहे. पण शनिवारी तुर्कीहून आलेल्या एका बातमीने सर्वांना समाधान मिळालं आहे. 

तुर्कीमध्ये एका वयोवृद्ध महिलेने कोरोनावर मात केली आहे. या महिलेचं वय 116 वर्ष इतकं आहे. वयाच्या 116 व्या या महिलेने कोरोनासारख्या गंभीर आजारावर मात केली आहे.

116 वर्षांच्या वृद्ध महिलेने कोरोनाला हरवलं आहे. असं करून, ती कोविड साथीला हरवण्यासाठी सर्वात वृद्ध लोकांच्या यादीत त्यांच्या समावेश करण्यात आला आहे. वृद्ध महिलेचा मुलगा इब्राहिमने शनिवारी डेमिरोरेन वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. आयसे कराते असं या महिलेचं नाव असून या महिलेला आता सामान्य वॉर्डात हलवण्यात आलं आहे.

या महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, माझी आई वयाच्या 116 व्या वर्षी आजारी पडली होती. 3 आठवडे तिच्यावर ICU मध्ये उपचार करण्यात आले. तिची तब्येत आता ठीक आहे आणि ती बरी आहे

यापूर्वी, फ्रेंच नन सिस्टर आंद्रे तिच्या 117 व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी फेब्रुवारीमध्ये कोविड -19 मधून बरे झाली होती.